Ravikant Tupkar : कापूस (Cotton), सोयाबीन (Soybean) पिकविम्याच्या प्रश्नावर आक्रमक असलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (Swabhimani shetkari Sanghatana) नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) गेल्या तीन दिवसांपासून भूमिगत आहेत. तुपकर भूमिगत झाल्याने प्रशासनाचं टेन्शन वाढलं आहे. शेतकऱ्यांसोबत आत्मदहन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. त्यामुळे बुलढाणा (Buldana)आणि मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) त्यांची शोध मोहीम सुरु केली आहे. बुलढाणा पोलीस हाय अलर्टवर असून, पोलिसांनी रविकांत तुपकर यांना 149 अन्वये नोटीस बजावली आहे.


Ravikant Tupkar on Govt : सरकारने आमची फसवणूक केली 


रविकांत तुपकर यांनी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालय किंवा मुंबई स्थित AIC या पीकविमा कंपनीच्या कार्यालयासमोर शेतकऱ्यांसोबत आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे. सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांची राज्य आणि केंद्र सरकारने फसवणूक केली आहे. हजार शेतकरी गेल्या तीन महिन्यापासून रस्त्यावर उतरत आहोत. सरकारने वेळोवेळी आमच्यासोबत चर्चा, बैठका केल्या. सरकारने आम्हाला आश्वासनं दिली, त्यांनी आमची फसवणूक केली आहे. कापसाला, सोयाबीनला दरवाढ मिळत नाही. 70 ते 80 टक्के सोयाबी आणि कापूस शेतकऱ्यांच्या घरात पडून पण अशात सरकार चर्चा करायला तयार नसल्याचे तुपकरांनी सांगितले आहे. 


Ravikant Tupkar : एकतर आम्हाला आत्मदहन करु द्या, नाहीतर बंदुकांची गोळ्या घाला


अद्याप अनेक शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळाली नाही. प्रशासनाच्या चुकीच्या कारभारामुळे नुकसान भरपाईचे पैसे शेतकऱ्यांना मिळाले नाहीत. आम्हाला पीक विम्याची रक्कम आणि नुकसान भरपाईची रक्कम ताबडतोब द्या अशी मागणी रविकांत तुपकर यांनी केली आहे. तसेच सोयाबीन आणि कापसाला दरवाढ देण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे. जर आज म्हणजे 10 फेब्रुवारीपर्यंत सरकारने याबाबत निर्णय घेतला नाही तर 11 फेब्रुवारीला हजारो शेतकरी बुलढाणा जिल्ह्याधिकारी कार्यालयासमोर येणार आहोत. एकतर आम्हाला आत्मदहन करु द्या, नाहीतर पोलिसांच्या बंदुकांच्या गोळ्यांनी आम्हाला शहीद करा. एकतर आमचं जगण मान्य करा नाहीतर आम्हाला मारुन टाका अशी भूमिका आमची असल्याचा इशारा तुपकर यांनी दिला आहे. 11 फेब्रुवारीपासून विदर्भ, मराठवाड्यातील कापूस उत्पादक शेतकरी अतिशय आक्रमकपणे रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा तुपकरांनी दिला आहे. त्यामुळे रविकांत तुपकरांच्या या भूमिकेवर आता राज्य सरकार काय निर्णय घेणार हे पाहमं महत्वाचं ठरणार आहे. 


महत्त्वाच्या बातम्या:


Buldhana : स्वाभिमानी'चे नेते रविकांत तुपकरांना बुलढाणा पोलिसांची नोटीस, तुपकर आंदोलनावर ठाम, कार्यकर्ते संतप्त