Lumpy Vaccination : लम्पी स्कीनच्या प्रादुर्भावामुळं (Lumpy Skin Disease) देशातील पशुपालक चिंतेत आहेत. याचा मोठा फटका दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. आत्तापर्यंत लम्पी स्कीनच्या आजारामुळं देशात 1 लाख 55 हजार 724 जनावरांचा मृत्यू झाल्याची माहिती पशुसंवर्ध मंत्रालयाच्या (Ministry of Animal Husbandry) वतीनं देण्यात आली आहे. तर आत्तापर्यंत देशात 29 लाख 52 हजार 223 जनावरांना लम्पी स्कीन आजाराची लागण झाली आहे. 


आत्तापर्यंत 6.50 कोटी गायींना लसीकरण 


केंद्रीय पशुसंवर्धन मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार आत्तापर्यंत  6.50 कोटी गायींना लसीकरण केले आहे. आणखी 9 कोटी जनावरांना लसीकरण करणे बाकी असल्याची माहिती देण्यात आली आहे. साडेपाच कोटीहून अधिक दुभत्या गायींची संख्या आहे. तर रस्त्यावर फिरणाऱ्या गायींची संख्या देखील लक्षणीय आहे. 50 लाखांच्या आसपास रस्त्यावर फिरणाऱ्या गायी आहेत. सध्या प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणावर जनावरांना लसीकरण सुरु आहे.  लम्पी स्कीनच्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी योग्य ती काळजी घेण्याचं आवाहन देखील प्रशासनं केलं आहे.


कोणत्या राज्यात किती झालं लसीकरण


राज्य               लसीकरण                     लसीकरण बाकी


छत्तीसगड        19.15 लाख                       25 लाख
गुजरात             63.19 लाख                      63.49 
महाराष्ट्र            1 कोटी 31 लाख                 1 कोटी 50 लाख
पंजाब              9.21 लाख                         25 लाख         
उत्तर प्रदेश        1 कोटी 57 लाख                 1 कोटी 60 लाख     
हिमाचल प्रदेश    3 लाख 51 हजार                24 लाख
जम्मू काश्मीर      19.64  लाख                     20 लाख
कर्नाटक              40 लाख                          1 कोटी 14 लाख
राजस्थान            1 कोटी 2 लाख                 1 कोटी 49 लाख   


वरील माहितीनुसार आत्तापर्यंत सर्वात जास्त लसीकरण हे उत्तर प्रदेशमध्ये झाले आहे. यूपीमध्ये 1 कोटी 57 लाख जनावरांना आत्तापर्यंत लसीकरण करण्यात आलं आहे. तर त्यानंतर महाराष्ट्रात 1 कोटी 31 लाख जनावरांना लसीकरण करण्यात आलं आहे. तर राजस्थानमध्ये 1 कोटी 2 लाख जनावरांना लसीकरण करण्यात आल्याची माहिती केंद्रीय पशुसंवर्धन मंत्री पुरुषोत्तम रुपाला यांनी दिली आहे. आणखी प्रशासनाकडून जनावरांना लसीकरण सुरुच आहे. मात्र, आत्तापर्यंत लम्पी स्कीनच्या आजारामुळं देशात 1 लाख 55 हजार 724 जनावरांचा मृत्यू झाला आहे.  


गायीचा मृत्यू झाल्यास 30 हजारांची मदत


लम्पी आजाराच्या प्रादुर्भावामुळं जर गायीचा मृत्यू झाला तर महाराष्ट्र सरकारकडून पशुपालकांना 30 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. तर बैलाचा मृत्यू झाल्यास 25 हजार रुपये दिले जातात. याशिवाय वासराचा जर मृत्यू झाला तर 16 हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात येते. लम्पी स्कीनच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने सर्व जनावरांना लसीकरण करण्याच्या सूचना दिल्या आहेत.


महत्त्वाच्या बातम्या:


Lumpy Skin Disease : महाराष्ट्रात लम्पीतून आत्तापर्यंत 1 लाख 12 हजार जनावरे बरी, 97 टक्के लसीकरण पूर्ण