Agriculture News : राज्याच्या विविध भागात पावसानं (Rain) जोरदार हजेरी लावली आहे. काही ठिकाणी नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. तर काही ठिकाणी या पावसामुळं शेतकऱ्यांच्या पिकांना देखील फटका बसला आहे. पुणे (Pune) जिल्ह्यात देखील मुसळदार पाऊस झाला आहे. बारामती (Baramati) तालुक्यात या पावसामुळं अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरलं आहे. या सतत पडत असलेल्या पावसामुळं अंजीर आणि सीताफळ उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत.
सततच्या पावसामुळं फळांवर काळे डाग
बारामती तालुक्यात मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. या पावसामुळं ओढ नाले दुथडी भरुन वाहत आहेत. अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरलं आहे. तसेच सततच्या पावसाचा शेती पिकांना देखील फटका बसत आहे. पावसामुळे अंजीर आणि सीताफळ उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. दौंड तालुका आणि पुरंदर तालुक्यामध्ये सीताफळ आणि अंजिराचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. परंतू पावसामुळं काही शेतकऱ्यांच्या फळावर काळे डाग आणि कोळीचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येत आहे. बारामती तालुक्यातील सोमेश्वर आणि निंबुत भागात हा जोरदार पाऊस बरसला आहे. या पावसामुळं शेती पिकांचे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण, अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरलं आहे. या पाण्यामुळं पिकं वाया जाण्याची शक्यता आहे. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहेत.
राज्याच्या विविध भागात पावसाची हजेरी
सध्या राज्याच्या विविध भागात पावसानं हजेरी लावली आहे. उघडीप दिलेल्या पावसानं पुन्हा एकदा जोर धरला आहे. मुंबईसह, ठाणे नवी मुंबई, पालघर या परिसरात विजांच्या कडकडाटासह पावसानं हजेरी लावली आहे. तर दुसरीकडे पुणे, नागपूर कोकणातील सिंधुदुर्गमध्येही मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. आजही अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. दरम्यान, आजही राज्यात कोकणसह, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. लातूर जिल्ह्यात देखील जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. लातूर शहरालगत असलेल्या अनेक शेतांमध्ये पाणी साचल्यानं पिकांचे नुकसान झालं आहे. अनेक दिवसांच्या उघडीपीनंतर झालेल्या या तुफान पावसामुळं पिकांना जीवदान मिळण्याऐवजी पिकं वाहून जाण्याची वेळ आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या: