Double Profit less Expense : बाजारातील कमी जास्त दरामुळे कांदा उत्पादक शेतकरी नेहमीच अडचणीत आलेला असतो. परंतु, आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकार आर्थिक मदत देणार आहे. ईशान्येकडील राज्यांना कांदा उत्पादनात स्वावलंबी बनविण्यासाठी सरकार खास योजना आणत आहे. या योजनेत राष्ट्रीय फलोत्पादन अभियानाचा समावेश करण्यात आला असून, त्याअंतर्गत शेतकऱ्यांना प्रशिक्षण आणि आर्थिक अनुदानाची तरतूद करण्यात आली आहे.
खरीप कांद्याला अनुदान मिळाल्याने शेतकऱ्यांना पेरणीपासून काढणीपर्यंतच्या खर्चात दिलासा मिळणार आहे. त्यामुळे कांदा उत्पादनातून चांगला नफा कमविण्याची शेतकऱ्यांना संधी आहे. कांद्याचे उत्पादन कमी असल्यामुळे त्याचे भाव गगनाला भिडतात. त्यामुळे सर्वसामान्यांना कांदा घेणे परवडत नाही. तर काही वेळा उत्पादन जास्त झाले की कांद्याचे दर पूर्ण पणे पडतात. त्यामुळे शेतकऱ्यांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान होते. मात्र खरीप हंगामात कांद्याची लागवड केल्यास ईशान्येकडील राज्यांतील कांद्याची टंचाई वेळेवर भरून निघेल. त्यामुळे केंद्र सरकार कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक मदत देणार आहे.
शेतकऱ्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी देशातील काही राज्यांच्या सरकारकडून शेतकऱ्यांना आर्थिक अनुदान देण्यात येत आहे. उत्तर प्रदेशमध्ये खरीप कांद्याच्या लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी योगी सरकार शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 12000 रुपये या दराने आर्थिक अनुदान देत आहे. या योजनेचा लाभ अशा शेतकऱ्यांना मिळणार आहे जे उच्च दर्जाच्या कांद्याचे उत्पादन घेतील. यासाठी शेतकरी त्यांच्या जवळच्या कृषी विभागाशी संपर्क साधून अर्ज करू शकतात. त्यानंतर राज्य सरकार आणि कृषी अधिकारी लाभार्थी शेतकऱ्यांची निवड करतील. चांगल्या प्रतीचा कांदा पिकवणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदानाची रक्कम जमा केली जाईल. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगल्या दर्जाच्या बियाणांची खरेदी आणि इतर कृषी कामांच्या खर्चावर दिलासा मिळणार आहे.
कांदा या पिकापासून चांगले उत्पादन घेण्यासाठी लागवडीपासून काढणीपर्यंत प्रत्येक काम अत्यंत काळजीपूर्वक करावे लागते. कांद्यासाठी चांगल्या दर्जाची खते, बियाणे आणि सेंद्रिय पद्धतीने करणे आवश्यक आहे. तज्ज्ञांच्या मते, कांदा पिकापासून चांगले व आरोग्यदायी उत्पादन घेण्यासाठी चांगल्या प्रतीचे बियाणे वापरणे आवश्यक आहे. जेणेकरून पिकावर कीड व रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता कमी असते. शिवाय कांदा पिकाला जास्त कष्ट करावे लागत नाही. खरीप हंगामातील कांदा लागवडीसाठी एन-53, एफ-1 संकरित बियाणे कांदा, ब्राऊन स्पॅनिश आणि एन-257-1 तसेच अॅग्रीफाऊंट डार्क रेड, भीमा सुपर, एल. 883 आणि अॅग्रीफाऊंट लाइट रेडचा समावेश सर्वाधिक उत्पादन देणाऱ्या वाणांमध्ये करण्यात आला आहे.
सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून शेतकरी खतांचा कमी वापर करूनही चांगले उत्पादन घेऊ शकतात.
खतांच्या जागी जीवामृतचा वापर करावा असे तज्ञ्ज्ञांचे मत आहे. रासायनिक खतांच्या जागी शेतकरी शेणखत आणि निंबोळी खताचा वापर करू शकतात. शेतातील कीड नियंत्रणासाठी रासायनिक कीटकनाशकांऐवजी कडुनिंबाच्या सेंद्रिय कीटकनाशकांचा वापर सुरक्षित आहे. सिंचनासाठी ठिबक सिंचन तंत्रज्ञानाचा वापर करावी, त्यामुळे पाण्याची मोठ्या प्रमाणात बचत होते. कांद्याला पाणी देताना नेहमी संध्याकाळी द्यावे असे शेती अभ्यासकांचे मत आहे.