Onion Market: गेल्या चार दिवसांपासून राज्यात तुफान पावसाने हजेरी लावली आहे. आधी पूर्व मौसमी आणि आता मान्सूनची हजेरी लागल्यानंतरही काढणीला आलेली उन्हाळी पिके पाण्याखाली गेली आहेत.  शेतकऱ्यांचा कांद्याच्या चाळी भिजल्या आहेत. मार्केटमध्ये नेण्यासाठी बाहेर काढून ठेवलेला कांदा आता पूर्णतः चिखलात माखला आहे . कांदा भिजल्यामुळे मार्केट यार्डात कांद्याच्या भावात मोठी तफावत दिसून येत आहे. शेतकऱ्याला क्विंटल मागे 800 ते 1000 रुपयांचा भाव मिळत असल्याने शेतकरी हतबल झाला आहे.  सर्वाधिक कांद्याचे उत्पादन होणाऱ्या नाशिक जिल्ह्यात आज सकाळच्या सत्रात 6000 क्विंटल कांद्याची आवक झाली. क्विंटल मागे सर्वसाधारण दर हा 1000 ते 1200 रुपयांपर्यंत शेतकऱ्यांना मिळतोय. 

आज कांदा बाजारभाव काय?

राज्यभरातील बहुतांश कांदा बाजारपेठेत कांद्याचा दर घसरला आहे . गेल्या चार दिवसांपासून राज्यात कांद्याचे आवकही वाढली आहे .साधारणतः दोन ते चार लाख क्विंटल कांदा दररोज बाजारपेठेत येत आहे . पणन विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, कांद्याला क्विंटल मागे गेल्या चार दिवसांपासून मिळणाऱ्या दर हा 700 ते बाराशे रुपयांपर्यंत आहे .कोल्हापूर मध्ये आज कांद्याचा दरात काहीशी वाढ झाली असली तरी पंधराशे रुपयांचा सर्वाधिक भाव मिळतोय . .आधी अवकाळी ने झोडपलं .नंतर वळवाच्या पावसानं आणि आता मान्सूनला सुरुवात झाली आहे .

जिल्हा जात/प्रत आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
28/05/2025
छत्रपती संभाजीनगर --- 2413 200 1500 850
जळगाव उन्हाळी 21 800 1200 1000
कोल्हापूर --- 3543 500 2300 1500
मंबई --- 11231 900 1600 1250
नागपूर लोकल 13 1100 1500 1300
नाशिक उन्हाळी 6000 500 1670 1230
पुणे लोकल 8272 633 1500 1067
सांगली लोकल 3860 500 1800 1150
सातारा लोकल 15 700 1600 1100
सातारा हालवा 24 500 1400 1400
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील) 35392  

अनेक जिल्ह्यात बरसून गेलेल्या पावसाची दाहकता आता समोर आली असून शेतकऱ्यांच्या डोळ्यादेखत हाता तोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. परिणामी पावसामुळं बळीराजा पुन्हा हवालदिल झाला असून सध्या शेतकऱ्यांच्या डोळ्यात अन् रानात पाणीच पाणी बघायला मिळत आहे. उन्हाळी कोथिंबीर शेतकऱ्याला आर्थिक फायदा करून देणारी असते. मात्र गेली दहा ते अकरा दिवसापासून सुरू असलेल्या पावसाने धाराशिव जिल्ह्यामध्ये कोथिंबीर उत्पादक शेतकऱ्याच्या उत्पादनावरती अक्षरशा: पाणी फिरवले आहे.

Maharashtra Weather Update: बळिराजांचे स्वप्न भंगलं! हाता तोंडाशी आलेला घास डोळ्यादेखत हिरावला; शेतकऱ्यांच्या डोळ्यात अन् रानात पाणी