Parbhani Rain : सध्या राज्यात परतीच्या पावसानं (Rain) धुमाकूळ घातला आहे. या परतीच्या पावसामुळं नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. तर काही ठिकाणी या पावसामुळं वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. तसेच या परतीच्या पावसाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. शेती पिकांचं मोठं नुकसान झाल्यानं शेतकरी संकटात सापडला आहे. परभणी (Parbhani) जिल्ह्यात देखील पावसानं जोरदार हजेरी लावली. या पावसामुळं काढणीला आलेलं सोयाबीन (Soybean) पूर्णपणे पाण्यात गेलं आहे. त्यामुळं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे.


परभणीच्या सेलू तालुक्यात मुसळधार पाऊस झाला आहे. या पावसामुळं अनेक ओढ्यांना-नाल्यांना मोठ्या प्रमाणावर पाणी आलं आहे. अचानक पडलेल्या या मुसळधार पावसामुळं अनेकजण शेतात अडकले होते. ज्यांना दोरीच्या सहाय्याने गावकऱ्यांनी सुखरुप बाहेर काढलं. महत्त्वाचे म्हणजे काढणीला आलेलं सोयाबीन पीक पूर्णपणे पाण्याखाली गेलं आहे. त्यामुळं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. सेलू तालुक्यातील वालूर, रायपूर, कुपटा या परिसरात पावसाचा जोर जास्त असल्यानं स्थानिक शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. त्यामुळं तत्काळ पिक विमा आणि मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.




राज्याच्या विविध भागात पावसाची हजेरी


राज्याच्या विविध भागात परतीचा पाऊस कोसळत आहे. काही ठिकाणी तर ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे. या परतीच्या पावसाचा शेतकऱ्यांना मात्र मोठा फटका बसत आहे. शेती पिकांचं मोठं नुकसान या पावसानं झालं आहे. मुंबईसह ठाणे परिसरात पावसानं चांगलीच हजेरी लावली. तसेच विदर्भातील अकोला जिल्ह्यात या परतीच्या पावसानं धुमाकूळ घातला आहे. तसेच बीड, नागपूर,गडचिरोली, चंद्रपूर, पुणे या जिल्ह्यांना पावसानं चांगलच झोडपलं आहे. दरम्यान, हवामान विभागानं (Department of Meteorology) दिलेल्या अंदाजानुसार राज्यात आजही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज उत्तर महाराष्ट्र वगळता संपूर्ण कोकणसह, पश्चिम महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.


अकोल्यात ढगफुटी सदृश्य पाऊस


अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील बोर्डी परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे. पावसामुळं बोर्डी गावाला नदीचं स्वरुप आलं आहे. अकोट तालुक्यातील बोर्डी परिसराला पावसानं अक्षरश: झोडपून काढलं आहे. 1965 नंतर आलेल्या सर्वात मोठ्या पुराचा मोठा फटका बोर्डी गावाला बसला आहे. या गावात पावसानं अनेक घरात पाणी घुसलं आहे. अनेक घरांच्या भिंती  देखील पडल्या आहेत. या पावसामुळं गावाशेजारुन वाहणाऱ्या घोगा आणि लेंडी नाल्याचं पाणी गावात घुसलं होतं. या गावात या पुरामुळे अनेक संसार उघड्यावर पडलेत.  धान्य, शेतमाल, संसारोपयोगी वस्तू अक्षरश: मातीमोल झाल्या आहेत. 


महत्त्वाच्या बातम्या: