Ajit Pawar : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी इकडून तिकडे फेऱ्या मारण्यापेक्षा शेतकऱ्यांना मदत करावी, असे वक्तव्य विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलं. मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी आम्हाला आमचं काम करु द्यावं, त्यांनी त्यांचं काम करावं असेही अजित पवार म्हणाले. मदत मिळत नसल्यानं शेतकऱ्यांनी आत्महत्या केली, मग एकनाथ शिंदे 302 चा गुन्हा कोणावर दाखल करावा ते अगोदर सांगा? असा सवाल पवार यांनी उपस्थित केला. आधी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना धीर द्या असेही अजित पवार म्हणाले.


आमचा दौरा राजकारणासाठी नाही


अजित पवार हे अतिवृष्टीनं नुकसान झालेल्या विदर्भ आणि मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहे. काल त्यांनी विदर्भाचा दौरा केला. आज ते नांदेड जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाचा पाहणी दौरा करत आहे. मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचं काम करावं, आम्हाला आमचं काम करुन द्यावं असेही पवार म्हणाले. आम्ही राज्याच्या पूर परिस्थितीचा पाहणी दौरा करत आहोत. आमच्या दौऱ्याबद्दल ते चर्चा करत आहेत. त्यापेक्षा त्यांनी त्यांचं काम करावं असा टोला विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी लगावला. दरम्यान आम्ही हा दौरा राजकारणासाठी करत नाही. यामध्ये त्यांनी राजकारण करु नये. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी ही गोष्ट गांभीर्यानं घेतली पाहिजे असेही अजित पवार म्हणाले.




सरकारनं शेतकऱ्यांना आत्मविश्वास द्यावा


अतिवृष्टी होऊन बरेच दिवस झाले आहेत. पिकांचे नुकसान झाले आहे. घरे पडली आहेत. त्याचे अद्यापही पंचनामे झाले नाहीत. त्यामुळं तत्काळ पंचनामे होऊन शेतकऱ्यांना मदत मिळावी, अशी मागणी अजित पवार यांनी केली आहे. दरम्यान एकनाथ शिंदे तुम्ही सगळीकडे फिरत आहेत. शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही, म्हणून अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केलीय. मग 302 चा गुन्हा कुणावर दाखल करावा ते एकनाथ शिंदेंनी सांगावं? असा प्रश्न अजित पवारांनी केला. त्यामुळं सरकारनं शेतकऱ्यांना आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी त्यांना आत्मविश्वास द्यावा जेणेकरुन ते आत्महत्या करणार नाहीत असेही अजित पवार म्हणाले.


अजित पवार हे विविध ठिकाणी थांबून बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधत आहे. पूर परिस्थितीचा आढावा घेत आहेत. मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांना  अतिवृष्टीचा खूप मोठा फटका बसला आहे. त्यांची उभी पिकं अतिवृष्टीमुळं वाया गेली आहेत. त्यामुळं तत्काळ या शेतकऱ्यांना मदत मिळावी अशी मागणी अजित पवार यांनी केली आहे.


महत्वाच्या बातम्या: