Narendra Singh Tomar : भूतानचे आर्थिक व्यवहार मंत्री लोकनाथ शर्मा (Loknath Sharma ) यांनी केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर (Narendra Singh Tomar) यांची नवी दिल्लीत भेट घेतली. भारतानं भूतानला कृषी क्षेत्रात सर्वतोपरी सहकार्य केलं आहे. यापुढे देखील भूतानला भारताचं सहकार्य कायम राहील असे मत केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी व्यक्त केलं. भूतानच्या शिष्टमंडळाचे तोमर यांनी स्वागत केले. स्वागत करताना तोमर यांनी दोन्ही देशांमधील दीर्घकालीन मैत्रीपूर्ण संबंधांबद्दल आनंद व्यक्त केला. तसेच भारतानं केलेल्या सहकार्याबद्दल आभार भूतानचे मंत्री शर्मा यांनी आभार मानले आहेत.



भूतानमधील कृषी उत्पादनांसाठी भारतीय बाजारपेठ खुली करण्यावर काम सुरु


पंतप्रधान झाल्यावर नरेंद्र मोदी यांनी भेट दिलेला भूतान हा पहिला देश होता. यामधून आपले मजबूत संबंध अधोरेखित होत असल्याचे तोमर यावेळी म्हणाले. भूतान आणि भारत यांच्यातील मैत्री अधिक वाढावी यासाठी भारत सहकार्य करत आहे. दोन्ही देशांमधील व्यापारी भागीदारी देखील मजबूत झाली आहे. आपले संबंध आणखी दृढ व्हावेत यासाठी भारत अनुकूल आहे. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय आणि अन्य मंत्रालये भूतान बाबत भरीव निर्णय घेत आहेत. भूतानमधील विविध कृषी उत्पादनांसाठी भारतीय बाजारपेठ खुली करण्यावर देखील आम्ही काम करत आहोत.




आले निर्यातील परवानगी


दरम्यान, भूतानने भारतात आले निर्यात करण्यास परवानगी द्याव अशी मागणी केली होती. भूतानच्या विनंतीवरुन त्यांना भारतामध्ये आले निर्यातीला तसेच आणखी एक वर्ष  बटाट्याची निर्यात करण्याची परवानगी देण्यात आली असल्याची माहिती तोमर यांनी यावेळी दिली. भारत आणि भूतान हे दोन्ही देश कृषी क्षेत्रात एकत्र काम करत राहतील. तसेच अंतर्गत आणि बाह्य परिस्थिती लक्षात घेऊन भूतानच्या विनंतीबाबत आवश्यक असेल त्या वेळी आम्ही सकारात्मक दृष्टीकोन ठेवू असे आश्वासन देखील तोमर यांनी यावेळी दिले. 


भारतानं केलेल्या सहकार्याबद्दल आभार


भूतानचे आर्थिक व्यवहार मंत्री लोकनाथ शर्मा यांनी भूतानला केल्या जाणाऱ्या साखरेच्या पुरवठ्यासह विविध बाबींमध्ये भारताने केलेल्या सहकार्याबद्दल आभार मानले. शेतीबाबतचे प्रश्न आपल्यासाठी महत्वाचे असून दोन्ही देशांमधील मैत्री आणखी वाढावी यासाठी आपण भारतात आल्याची माहिती यावेळी शर्मा यांनी दिली.