Bail Pola 2022 : आज शेतात राबणाऱ्या सर्जा-राजाचा म्हणजेच बैलपोळ्याचा (Bail Pola 2022) सण आहे. या निमित्ताने केवळ राज्यातच नव्हे तर जगभरात प्रसिद्ध असलेल्या जळगावात जैन उद्योग समूहातर्फे बैलांचे पूजन सालदार आणि शेतकऱ्यांचा सन्मान करत पोळा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला उपस्थित भारताचे अनुशास्त्रज्ञ डॉक्टर अनिल काकोडकर तसेच ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ साहित्यिक डॉ. भालचंद्र नेमाडे यांच्यासह जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन यावेळी उपस्थित होते.
जैन उद्योग समूहातर्फे आगळा-वेगळा बैलपोळा साजरा करण्याची परंपरा :
कृषी क्षेत्रात जळगावातील जैन उद्योग समूहाचा जगभरात विस्तार झाला आहे. या जैन उद्योग समूहातर्फे गेल्या 25 वर्षांपासून बैलपोळा हा सण साजरा करण्यात येतो. जैन समूहाच्या जळगावातील विविध ठिकाणी कार्यरत शाखांच्या ठिकाणी ज्या बैलजोड्या असतात, तसेच सालदार आणि शेतकरी यांचा या दिवशी सन्मान केला जातो. जैन इरिगेशन येथे पोळ्याच्या दिवशी सर्व बैलजोड्या एकत्र येतात. ग्रामीण भागात ज्या पद्धतीने वातावरण असतं, अगदी त्याच पद्धतीने या ठिकाणी सजावट केलेली असते. यावेळी बैल घेऊन शेतकरी धावतात आणि जे नारळाचं तोरण बांधलेले असतं, त्या ठिकाणचा नारळ जो शेतकरी तोडतो, तो विजेता ठरतो. अशी परंपरा आहे. यावेळी सालदारांना तसेच शेतकऱ्यांना नवीन कपडे, भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान केला जातो. यावेळी सालदार, शेतकरी तसेच कंपनीतील कर्मचारी बांधव मोठ्या पद्धतीने नृत्य करत आनंद साजरा करतात. कामगार यावेळी शंकर महादेव, बैलांसह विविध वेशभूषा यावेळी परिधान करून नृत्य सादर करतात. अशा आगळ्या वेगळ्या पद्धतीने बैलपोळा साजरा करण्याची जैन उद्योग समूहाची परंपरा आहे.
दोन वर्षांपासून कोरोना महामारीमुळे महाराष्ट्रात तसेस जगभरात सर्वच सणांवर बंधनं आली. मात्र, यंदा बैलपोळा हा सण अत्यंत उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थित सर्व कर्मचाऱ्यांनी पारंपारिक वाद्य तसेच ढोलताशांच्या तालावर नृत्य करत आनंद साजरा केल्याचं पहायला मिळालं. यावेळी भारताचे अनुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर, ज्येष्ठ मराठी साहित्यिक तसेच ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त डॉ. भालचंद्र नेमाडे यांची उपस्थिती असल्याचं पाहायला मिळाली. त्यांनी यावेळी ठेका धरल्याचं पहायला मिळालं.
महत्वाच्या बातम्या :