Agriculture News : सध्या केरळमधील (kerala) एका शेतकऱ्याचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. कारण हा शेतकरी आपल्या ऑ़डी A4 या गाडीतून भाजी विकत आहे. तुमचा विश्वास बसणार नाही पण हे खरं आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं त्यानं आपल्या शेतीत अमूलाग्र बदल केले आहेत. विविध पिकांच्या माध्यमातून भरघोस उत्पादन घेतलं आहे. सुजीत असं या शेतकऱ्याचं नाव असून, सध्या सोशल मीडियावर या शेतकऱ्याची जोरदार चर्चा सुरु आहे.
शेतकऱ्यानं मेहनतीच्या बळावर मिळवलं मोठं यश
आपण शेतकरी कधी ट्रॅक्टरवर, तर कधी ऑटोवर तर कधी मोटारसायकलवर फिरताना पाहतो. पण अलिकडच्या काळात शेतीतून प्रगती साधत शेतकरी चारचाकी वाहनातून फिरताना दिसत आहेत. शेतकरी आलिशान गाड्यांवर बसून बाजारात पिकं विकत आहेत. अशाच एका केरळमधील शेतकऱ्याने आपल्या मेहनतीच्या बळावर मोठं यश मिळवलं आहे. केरळमधील हा शेतकरी कोणत्याही सामान्य वाहनात नाही तर आपल्या ऑ़डी A4 गाडीत फिरत असून, याच गाडीतून भाजीची विक्री करत आहे.
शेतकऱ्यांना शेती करताना विविध संकटांचा सामना करावा लागतो. कधी अस्मानी असतात तर कधी सुलतानी सकटांचा सामना करावला लागतो. या स्थितीत देखील काही शेतकरी भरघोस उत्पादन घेत आहेत. तंत्रज्ञानाच्या मदतीनं शेतीत मोठी क्रांती घडवून आणत आहेत. त्यामुळेच अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात सुशिक्षित तरुण देखील शेती क्षेत्राकडे वळत आहेत. केरळमधील सुजीत नावाच्या शेतकऱ्यानं ऑडी गाडी गेतली आहे. या शेतकऱ्याने आधुनिक आणि तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं प्रगती साधली आहे. त्याने इतर शेतकऱ्यांसमोर एक आदर्श ठेवला आहे. आपली अलिशान ऑडी A4 कार रस्त्याच्या कडेला उभी करुन ते भाजी विकत आहेत. हे दृश्य पाहून लोक थक्क झालेत.
सुजित सोशल मीडियावर व्हायरल
सुजित त्याच्या परिसरात खूप लोकप्रिय शेतकरी आहे. सुजितचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रोफाइल आहे. प्रत्येक प्रोफाईलवर तो त्याच्या शेताची, पिकांची आणि त्याच्या कुशल कारागिरांची छायाचित्रे शेअर करतो. अशा परिस्थितीत त्यांची लोकप्रियता आणखी वाढली आहेत. सुजीतने सोशल मीडियावर आपल्या ऑडीचे अनेक फोटो शेअर केले आहेत. तसेच त्याने काही फोटो आणि व्हिडिओ देखील व्हायरल केले आहेत. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तो शेतकरी त्याची ऑडी बाजारात घेऊन जाताना दिसत आहे. यानंतर शेतकरी प्लॅस्टिकचा पत्रा टाकून त्यावर भाजीपाला विकत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुजीतने ही ऑडी सेकंड हँड खरेदी केली आहे. या कारची स्वतःची खासियत आहे. नवीन Audi A4 44 लाख ते 52 लाख रुपयांच्या किमतीत उपलब्ध आहे.
महत्त्वाच्या बातम्या: