Hingoli News : हिंगोली (Hingoli) जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बोगस जैविक कीटकनाशके (Bogus Biological Pesticides) त्याचबरोबर खतांची विक्री मोठ्या प्रमाणात केली जाते. या बोगस कंपन्यावर कारवाई करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं मागील अनेक दिवसांपासून केली जात आहे. परंतू, कृषी विभागाच्या वतीनं यावर कोणतीही कारवाई केली जात नसल्यानं आज अखेर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी एक आगळ वेगळं आंदोलन केलं. एक जिवंत बकरा, कोंबडी, दारु, चखना घेऊन स्वाभिमानीचे कार्यकर्ते चक्क कृषी अधीक्षक कार्यालयातच दाखल झाले. आमच्याकडून पार्टी घ्या परंतू, बोगस जैविक कीटकनाशके त्याचबरोबर खतांच्या कंपन्यावर कारवाई करा, त्या विक्रेत्यांवर कारवाई करा अशी मागणी या स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी केली आहे.


प्रत्येक हंगामात शेतकऱ्यांची बोगस खते आणि बियाणे देऊन फसवणूक


प्रत्येक हंगामात शेतकऱ्यांची बोगस खते आणि बियाणे देऊन फसवणूक करण्यात आल्याच्या घटना समोर येत असतात. दरम्यान मागील काही दिवसांत कृषी विभागाने केलेल्या कारवाईतून देखील बोगस बियाणे विक्रीचे प्रकार समोर आले आहेत. त्यामुळे आता विक्री करणाऱ्यांविरोधातील अधिक कडक कायदा करण्याचा निर्णय राज्य सरकारंन घेतला आहे. दरम्यान असा कायदा अस्तित्वात आणण्यासाठीचे प्रारूप तयार करण्याचे काम सुरू असून, समितीचा निर्णय होताच, कायदा लागू करण्यात येईल, अशी माहिती अधिवेशनात कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली होती. 




यापूर्वी नोटांची उधळण करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं केलं होतं आंदोलन


बोगस खतांच्या संदर्भात यापूर्वी सुद्धा अशाच पद्धतीने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं कृषी अधिक्षक कार्यालयासमोर नोटांची उधळण करत आंदोलन केलं होतं. जैविक कीटकनाशक कंपन्यावर कारवाई करण्यासाठी अनोख्या पद्धतीचा आंदोलन स्वाभिमानीच्या वतीनं करण्यात आलं होतं. तेव्हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते नामदेव पतंगे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हे आंदोलन केलं होतं. कृषी अधीक्षक कार्यालयामध्येच हे आंदोलन केलं होतं. तेव्हा सुद्धा त्या आंदोलनाची जोरदार चर्चा झाली होती. परंतू कृषी विभागाच्या वतीने या आंदोलनाची कोणतीही दखल घेतली जात नसून, त्या बोगस जैविक कीटकनाशक कंपन्यावर कार्यवाही केली जात नाही. त्यामुळं आज हे आंदोलन केलं आहे. शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये आणि शासकीय किमतीत खत व्हावी, यासाठी कृषी विभागाच्यावतीने तपासणी मोहीम राबविली जात आहे.


महत्त्वाच्या बातम्या:


Fertiliser : खते महागणार? बळीराजाचा खर्च वाढणार; रशियाकडून सवलतीच्या दरात खत देणं बंद