Agriculture News : शेतीमालाच्या वायदेबाजावर घातलेल्या बंदी विरोधात स्वतंत्र भारत पार्टी (Swatantra Bharat Paksh) आक्रमक झाली आहे. याविरोधात येत्या 23 जानेवारीला मुंबईतील सेबी (SEBI) कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाला अनेक संघटना पाठिंबा देत असल्याची माहिती स्वतंत्र भारत पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट (Anil Ghanwat) यांनी दिली आहे. शेतीमालावर घातलेल्या वायदेबंदीला विरोध करण्यासाठी हजारो शेतकरी धरणे आंदोलनात सहभागी होणार असल्याचे अनिल घनवट म्हणाले.


 वायदेबाजावर बंदी घातल्यामुळं शेतीमालाचे भाव पडले


सन 2022 मध्ये अनेक शेतीमालाच्या वायदे बाजारातील व्यापारावर सेबीने बंदी घातली होती. डिसेंबरमध्ये ही मुदत संपणार होती. नवीन वर्षात शेतीमालाचे वायदे सुरु होतील अशी अपेक्षा होती. मात्र, सेबीने गहू, तांदूळ, चना, मूग, सोयाबीन तसेच त्याचे उपपदार्थ, मोहरी आणि त्याचे उपपदार्थ पमतेल या शेतीमलांवरील वायदेबंदीस डिसेंबर  2023 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. या निर्णयामुळे शेतीमालाचे भाव पडले आहेत. त्याचा थेट आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसत असल्याचे घनवट म्हणाले. त्यामुळं 23 जानेवारी सेबीच्या कार्यलयासमोर आंदोलन करण्यात येणार असल्याचे घनवट म्हणाले.


महाराष्ट्रभरातून हजारो शेतकरी येणार 


दरम्यान, स्वतंत्र भारत पार्टीने वायदेबंदी मागे घेण्याची सेबीला विनंती केली होती. मात्र, एक महिना झाला तरीही सेबीने काहीच प्रतिसाद न दिल्यामुळं आंदोलन करण्याची वेळ आली आहे. आंदोलनातील सर्व मागण्या शेतकरी हिताच्या आहेत. त्या मान्य असल्यामुळं शेतकरी संघटना (शरद जोशी), शेतकरी संघटना (रघुनाथदादा पाटील), किसानपुत्र आंदोलन, तसेच अनेक शेतकरी उत्पादक कंपन्यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला असल्याचे घनवट म्हणाले. महाराष्ट्रभरातून हजारो शेतकरी 23 जानेवारीला बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येथील सेबी कार्यालयासमोर होणाऱ्या आंदोलनात सहभागी होणार असल्याचे अनिल घनवट यांनी सांगितले.


रब्बी हंगामातीला पिकांना फटका बसण्याची शक्यता


रब्बी हंगामात पिकलेला शेतीमाल बाजारात येण्यास आता सुरुवात होईल. त्याच्या आगोदर सेबीने वायदेबाजार बंदी उठवावी अशी विनंती स्वतंत्र भारत पार्टीनं केली होती. कारण बायदेबाजार बंदी उठवली नाही तर रब्बी हंगामातील पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे. जर बंदी उठवली नाही तर सेबीच्या मुंबई येथील कार्यालयासमोर, स्वतंत्र भारत पार्टीच्या नेतृत्वाखाली बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येईल. या आंदोलनात शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपन्या व्यापारी, आयातदार तसेच वायदेबाजाराशी संबंधित सर्वांना सहभागी करून घेण्यात येणार असल्याचा इशारा घनवटांनी दिला होता. त्याप्रमाणे आता 23 जानेवारीला आंदोलन करण्यात येणार आहे.


महत्त्वाच्या बातम्या:


Agriculture News : शेतीमालाचे दर पाडण्यासाठीच वायदेबाजार बंदी, सेबीनं बंदी मागे न घेतल्यास आंदोलन; अनिल घनवटांचा इशारा