Agriculture News : दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या मनमाड बाजार समितीमध्ये विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात झेंडूची फुले आली आहेत. मात्र, या फुलांना योग्य प्रकारचा दर मिळत नसल्यानं फुल उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. सध्या फुलांनी प्रति किलोला अक्षरश 10 ते 15  रुपये असा कवडीमोल भाव मिळत आहे. त्यामुळं फुल उत्पादकांनी नाराजी व्यक्त केली आहे. दरात घसरण झाल्यामुळं फुल उत्पादकांचे दसरा गोड होण्याचे स्वप्न भंगले आहे. 


उत्पादन खर्चही निघणे कठीण


दसरा दिवाळी गोड होईल या आशेने शेतकऱ्यांनी दुष्काळात थोड्याफार शिल्लक पाण्यावर फुल शेती जगवली होती. मात्र, फुलांना मिळत असलेल्या भावाने उत्पादन खर्चही निघणे आता मुश्किल झाल्याने फुल विक्रीतून दसरा- दिवाळी सण गोड होण्याचे बळीराजाचे स्वप्न भंगले आहे..नाशिकच्या मनमाड बाजार समितीमध्ये सायंकाळी झालेल्या लिलावात जवळपास दीडशे झेंडूच्या फुलांच्या वाहनांची आवक झाली होती.


बाजार फुलांनी सजला मात्र दरात घसरण


सणासुदीचा उत्साह सुरु झाला आहे. ऐकामागून एक सण येत आहेत. सध्या नवरात्रोत्सव सुरु झाला आहे. या पार्श्वभूमीवर बाजार फुलांनी सजला आहे. फुलांना मोठी मागणी वाढली आहे. मात्र, फुलांना योग्य प्रकारचा दर मिळत नसल्याने शेतकरी नाराजी व्यक्त करतायेत. भर पावसाळ्यामध्ये गेले तीन ते चार महिने पिकांना पाणी मिळाले नाही. त्यामुळं अनेक शेतकऱ्यांची पिकं पाण्यावाचून शेतातच उभी जळून गेली आहेत. त्यामुळं शेतकऱ्यांच्या हाती काहीच लागले नसल्यानं शेतकरी चांगलाच अडचणीत सापडला आहे. अशातच सध्या मात्र नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर बाजारात फुलांना चांगलीच मागणी वाढली आहे. पेट्रोल आणि डिझेलचे वाढते दर तसेच पावसामुळं झालेलं नुकसान यामुळे फुलांच्या दरात यंदा चांगलीच वाढ होणार असल्याचे बोलले जात होते. मात्र, सध्या फुलांच्या दरात घसरण झाली आहे.


कमी पावसाचा पिकावर परिणाम


राज्यातील बहुतांश शेतकरी आता पारंपारिक पिकांबरोबरच फळबागांचे उत्पादन वाढवण्यावर भर देत आहेत. मात्र फुल उत्पादकांना कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकटांना सामोरं जावं लागत आहे. यावर्षी फुल उत्पादक शेतकऱ्यांना कमी पावसाचा मोठा फटका बसला आहे. फुल शेती पिकांवर वाईट परिणाम झाल्यानं बाजारात फुलांची आवकही 30 ते 40 टक्क्यांनी घटली आहे.


महत्त्वाच्या बातम्या:


Agriculture News : सणासुदीच्या पार्श्वभूमीवर फुलांनी बाजार सजला, किलोला मिळतोय एवढा दर