Pune rain : राज्याच्या अनेक भागात सध्या मुसळधार पाऊस कोसळाताना दिसत आहे. बऱ्याच ठिकाणी नदी नाल्यांना पूर आला आहे. त्यामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. या मुसळधार पावसामुळं अनेक ठिकाणी शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. नदी नाल्यांचे पाणी शेतात घुसल्यानं पिकं पाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळं राज्यातील शेतकरी चिंतेत आहेत. अशातच पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात मात्र उलट चित्र दिसत आहे. इथला शेतकरी या पावसामुळं आनंदात आहे. हा पाऊस भात शेतीसाठी पूरक ठरत आहे. महिनाभर उशिरा भात लागवड सुरु होऊनही शेतकऱ्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला आहे. 




राज्यात सद्या धो-धो पाऊस कोसळताना दिसत आहे. या पावसामुळं राज्यातील काही ठिकाणचे शेतकरी चिंतेत आहेत. मावळ तालुक्यातील शेतकरी मात्र, या पावसामुळं आनंदी आहेत. कारण हा पाऊस भात शेतीसाठी पूरक ठरत आहे. भात लागवड महिनाभर उशिरा सुरु होऊनही शेतकऱ्यांमध्ये मोठा उत्साह मिळत आहे. म्हणूनच तुफान पावसातही लागवडीची लगबग सुरु झाली आहे. दरम्यान गेल्या 7 दिवसापासून मावळ तालुक्यात पावसाची संततधार सुरु आहे. भर पावसात शेतकरी भात लागवड करताना दिसत आहे. गेल्या महिनाभरापासून शेतकरी पावसाची वाट बघत होते. अखेर चांगल्या पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळं शेतकरी आनंदी आहेत. सद्या मजुराची कमतरता असल्यानं यंत्राच्या सहाय्याने भात लागवड सुरु आहे. मात्र यंदा दरवर्षीपेक्षा भात लागवडीस उशीर झाला आहे.




भात लावणीसाठी चांगला पाऊस झाला आहे. त्यामुळं आम्ही लावडी सुरु केल्या आहेत. त्यामुळं आम्ही नंदी असल्याचे शेतकरी म्हणाले. जून महिन्यात सरासरीच्या 20 टक्केच पाऊस पडला. मात्र, जुलै महिन्यात चांगला पाऊस जाल्याची माहिती कृषी अधिकारी संतोष जाधव यांनी दिली. चांगला पाऊस पडल्यानं भात लागवडीला वेग आला आहे. यंत्रीकीकरणाच्या सहाय्यानं शेतकरी लावड करत असल्यानं लागवडीला वेग आला असल्याचे पाटील यांनी सांगितले. 


महत्त्वाच्या बातम्या: