नारळाचे महत्त्व आणि आरोग्यविषयक फायद्यांविषयी जागरूकता वाढवण्यासाठी दरवर्षी 2 सप्टेंबर हा दिवस जागतिक नारळ दिन म्हणून साजरा करतात.



नारळाचा उपयोग खाण्यासाठी, ओषधांसाठी, तेलासाठी तसेच इतर अनेक गोष्टींसाठी केला जातो.



नारळात मॅंगनीज, कार्बोहायड्रेट आणि प्रोटीन असते, जे हाडांसाठी खूप महत्वाचे आहे.



नारळाचे दूध आणि तेल त्वचेला चमकदार बनवण्यासाठी फायदेशीर आहे.



नारळात लोह आणि सेलेनियम असते, म्हणून ते लाल रक्त पेशींचे संरक्षण करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण अँटिऑक्सिडेंट म्हणून कार्य करते.



नारळाच्या सेवनाने कोलेस्ट्रॉलची पातळी सुधारण्यास मदत होते.



नारळाच्या पाण्यात व्हिटॅमिन सी, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम असते, जे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करते.



रोज नारळ पाणी प्यायल्याने शरीरातील ग्लुकोजची पातळी सामान्य राहते.



टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.