प्रभा अत्रे यांचा जन्म पुण्यात झाला.



बालपणापासूनच त्यांचा कल हा शास्त्रीय संगीताकडे होता.



पुढे जाऊन त्यांनी संगीतात डॉक्टरेट केलं . भारतीय शास्त्रीय संगीत या विषयावर त्यांचा गाढा अभ्यास होता.



प्रतिभावंत गायिका, संगीत रचनाकार, लेखिका, प्राध्यापिका आणि विदुषी म्हणून प्रभा अत्रे यांचा लौकिक होता.



प्रभा अत्रे यांनी 11 पुस्तके प्रकाशित करण्याचा जागतिक विक्रम केला आहे. त्यांनी हिंदी आणि इंग्रजी भाषेत संगीतावरील 11 पुस्तकांचे प्रकाशन केलं.



प्रभा अत्रे या अग्रगण्य हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत गायिकांपैकी एक होत्या.



पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण या पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आलं होतं.



आज पहाटे ह्रदयविकाराच्या धक्क्याने त्यांचं निधन झालं. त्यांचं वय 92 वर्षे होतं.