वास्तुशास्त्रात मनी प्लांट हे घरासाठी खूप शुभ मानले जाते. असे मानले जाते की, ज्या घरात मनी प्लांट असेल तेथे पैशाची कमतरता नसते.
पण जर तुम्ही मनी प्लांटशी संबंधित नियमांचे पालन केले नाही तर या प्लांटचेही तुमचे मोठे नुकसान होऊ शकते. त्यामुळे वास्तूनुसार जाणून घ्या नियम
घरात लावलेले मनी प्लांट शुभाचे प्रतीक मानले जाते. यामुळे आर्थिक स्थिती सुधारते आणि सकारात्मकता येते. पण त्याची पाने पिवळी पडली किंवा सुकली तर लगेच काढून टाकावीत. अन्यथा आर्थिक नुकसान होऊ शकते.
मनी प्लांट वाढू लागते तेव्हा त्याची वेल धाग्याच्या किंवा काठीच्या साहाय्याने वर चढवा. वास्तूनुसार मनी प्लांटच्या वेलीला जमिनीला स्पर्श करणे अशुभ मानले जाते.
कोणी कितीही जवळचे असले तरी आपल्या घरी लावलेला मनी प्लांट दुसऱ्याला देऊ नये. यामुळे घरातील आशीर्वाद निघून जातात. त्याचबरोबर मनी प्लांट कोणालाही भेट देऊ नये.
वास्तुशास्त्रानुसार मनी प्लांट नेहमी दक्षिण-पूर्व दिशेला लावावा. ही दिशा गणेशाची मानली जाते. पण लक्षात ठेवा मनी प्लांट ईशान्येला लावू नये.
मनी प्लांट शुक्र ग्रहाशी संबंधित आहे. अशा स्थितीत शुक्रवार हा लावण्यासाठी शुभ मानला जातो. शुक्रवारी हे रोप कापू नका.
अनेकजण घरात मनी प्लांट लावतात. असे मानले जाते की घरामध्ये मनी प्लांट लावल्याने धन, सुख, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा मिळते.
घरामध्ये मनी प्लांट चुकीच्या दिशेने किंवा चुकीच्या पद्धतीने लावलेल्या मनी प्लांटमुळे तुमचे आर्थिक नुकसानही होऊ शकते.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)