'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम वनिता खरात लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. वनिता खरात हे नाव आता घराघरांत पोहोचलं आहे. गेल्या काही दिवसांपासून वनिता लग्नबंधनात अडकणार असल्याच्या चर्चांना सुरुवात झाली होती. वनिताच्या लग्नाची तारीख आता समोर आली आहे. वनिताच्या लग्नाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. वनिता खरात 2 फेब्रुवारी 2023 रोजी बॉयफ्रेंड सुमित लोंढेसोबत लग्नबंधनात अडकणार आहे. वनिता लवकरच तिच्या लग्नासंदर्भात चाहत्यांना माहिती देणार आहे. वनिताचा बॉयफ्रेंड सुमित लोंढे हा एक उत्कृष्ट फोटोग्राफर आहे. सुमित लोंढे व्हिडीओ क्रिएटर असण्यासोबत ब्लॉगरदेखील आहे. वनिताने आता मालिकांचं शूटिंग करण्यासोबत लग्नाच्या तयारीला सुरुवात केली आहे.