उर्वशी रौतेला आज एक लोकप्रिय अभिनेत्री आहे.



नुकतीच तिची 'इन्स्पेक्टर अविनाश' ही वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली होती.



आता परवीन बाबी या बायोपिकमध्ये ती झळकणार आहे.



गेल्या काही दिवसांपासून उर्वशी रौतेलाचं नाव क्रिकेटर ऋषभ पंतसोबत जोडलं जात आहे.



उर्वशी रौतेलाने आजपर्यंत अनेक सुपरहिट सिनेमांत काम केलं आहे.



'सिंह साब द ग्रेट' या सिनेमाच्या माध्यमातून 2013 साली तिने सिनेसृष्टीत पदार्पण केलं



त्यानंतर 'सनम रे', 'ग्रेट ग्रॅंड मस्ती', 'हेट स्टेरी 4' आणि 'पागलपंती' या सिनेमांत तिने काम केलं.



उर्वशीचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसे यश मिळवू शकले नसले तरी तिचा स्टायलिश लूक इंटरनेटवर नेहमीच चर्चेत असतो.



बी-टाऊनच्या स्टायलिश अभिनेत्रींच्या यादीत उर्वशी पहिल्या क्रमांकावर आहे. पुन्हा एकदा तिचा लेटेस्ट लुक थक्क करणारा आहे.



या ब्लॅक गाऊनमध्ये अभिनेत्रीने हेवी मेकअप केला आहे.