महाराष्ट्र कोरोना निर्बंधमुक्त झाल्यानंतर मंदिरं खुली झाले आहेत.



तुळजाभवानी मंदिर आगामी शारदीय नवरात्र उत्सवात भाविकांसाठी 22 तास खुले राहणार आहे.



प्रशासनाकडून नवरात्र उत्सवाची जय्यत तयारी करण्यात आली आहे.



तुळजापूरची तुळजाभवानी म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राचं कुलदैवत.



26 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर या काळात तुळजाभवानी मंदिर 22 तास खुले राहणार आहे.



नवरात्रोत्सवात भाविकांची होणारी गर्दी विचारात घेऊन तुळजाभवानी मंदिर संस्थानने हा निर्णय घेतला आहे.



हे मंदिर रात्री 1 वाजता उघडले जाणार आणि रात्री 11 वाजेपर्यंत सुरु राहणार आहे.



यावर्षी 26 सप्टेंबर 2022 पासून नवरात्रोत्सवाला सुरुवात होत आहे.



घटस्थापना होऊन शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात होईल.