'तू झूठी मैं मक्कार' (Tu Jhoothi Main Makkaar) या श्रद्धा कपूर आणि रणबीर कपूरच्या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे.
'तू झूठी मैं मक्कार' हा चित्रपट 8 मार्च 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
'तू झूठी मैं मक्कार' चित्रपटाच्या ट्रेलरमधील श्रद्धाच्या लूकनं प्रेक्षकांची मनं जिंकली.
या चित्रपटाच्या ट्रेलमधील श्रद्धाच्या बिकनी लूकनं अनेकांचे लक्ष वेधले.
'एक व्हिलन', 'हैदर', 'बागी', 'हाफ गर्लफ्रेंड', 'हसिना पारकर','बत्ती गुल मीटर चालू', 'स्त्री', 'छिछोरे' यांसारख्या चित्रपटांमधून श्रद्धा प्रेक्षकांच्या भेटीस आली.
'तू झूठी मैं मक्कार' हा एक मल्टिस्टारर चित्रपट आहे.
या चित्रपटात रणबीर आणि श्रद्धा यांच्यासोबतच अनुभव सिंग बस्सी आणि
डिंपल कपाडिया, बोनी कपूर हे देखील प्रमुख भूमिका साकारणार आहेत.
आता श्रद्धाचा 'तू झूठी मैं मक्कार' हा त्यांचा आगामी चित्रपट
बॉक्स ऑफिसवर हिट ठरेल का? या प्रश्नाचं उत्तर लवकरच प्रेक्षकांना मिळेल.