पालघर जिल्ह्यातील वारली चित्रकलेने जागतिक पातळीवर आपला ठसा उमटवला आहे.

पालघरमधील सहा महिला चित्रकारांच्या मार्गदर्शनाखाली 120 महिला चित्रकरांनी जगातील सर्वात मोठं वारली चित्र साकारलं आहे.

G-20 परिषदेनिमित्त औरंगाबाद महानगरपालिका आणि स्मार्ट सिटीच्या सहकार्याने हा उपक्रम राबवण्यात आला.

G-20 परिषदेचा मान औरंगाबाद शहराला मिळाल्यानंतर, औरंगाबाद महापालिकेने वारली पेंटिंग काढण्याचे ठरवले.

यासाठी पालघरमधील 'द धवलेरी ग्रुप'च्या सहा महिला चित्रकार औरंगाबाद इथे गेल्या होत्या.

456 फूट लांब आणि सात फूट उंच अशा 3200 चौरस मीटरच्या भिंतीवर लार्जेस्ट वारली पेंटिंग साकारण्यात आली.

यावेळी 120 महिलांनी अवघ्या सहा तासात ही चित्रकला साकारत विश्वविक्रमाला गवसणी घातली.

या चित्रात वारली महिलेचे आयुष्य, लग्नापासून ते मृत्यूपर्यंतचे पारंपरिक, दैनंदिन जीवन, विविध विधी दर्शवण्यात आलं आहे.

ही चित्रकला नव्हे, तर वारली लिपी असल्याचे या महिला चित्रकारांनी सांगितले.