सूर्यग्रहण ही एक अशी घटना आहे, ज्याला विज्ञान, धर्म आणि ज्योतिषशास्त्रामध्ये खूप महत्त्व आहे.



ज्योतिषशास्त्रानुसार, गोवर्धन पूजेच्या दिवशी या सूर्यग्रहणाचा प्रभाव सर्व 12 राशींच्या जीवनावर पडणार आहे.



तर त्याचा शुभ प्रभाव काही राशींवर दिसून येईल. तर, काही राशी आहेत, ज्यावर सूर्यग्रहणाचा नकारात्मक प्रभाव पडेल



ज्योतिष शास्त्रानुसार जाणून घेऊया सूर्यग्रहणाच्या वेळी कोणत्या राशीच्या लोकांनी काळजी घ्यावी.



2022 मधील दुसरे आणि शेवटचे सूर्यग्रहण 25 ऑक्टोबर रोजी होणार आहे.



ऑक्टोबरचे सूर्यग्रहण सुमारे 4 तास 3 मिनिटे चालणार आहे. भारतीय वेळेनुसार हे सूर्यग्रहण दुपारी 2.28 ते सायंकाळी 6.32 पर्यंत राहील.



वृषभ- ज्योतिष शास्त्रानुसार हे सूर्यग्रहण वृषभ राशीच्या लोकांना समस्या देऊ शकते. या राशीच्या लोकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो.



मिथुन - या राशीच्या लोकांनी प्रवासात काळजी घ्यावी. नोकरी किंवा व्यवसायात काही बदल होऊ शकतात.



कन्या - या राशीच्या लोकांसाठीही हे सूर्यग्रहण शुभ नाही. ज्योतिषशास्त्रानुसार, या काळात महत्त्वाचे निर्णय न घेतल्यास बरे राहील.



तूळ - ज्योतिषशास्त्रानुसार सूर्यग्रहणाच्या वेळी सूर्य तूळ राशीत राहील. या काळात त्यांचे आर्थिक नुकसान होऊ शकते.