गुरुवारी मोठी पडझड झाल्यानंतर आज शेअर बाजाराची दणक्यात सुरुवात झाली
आज गुंतवणूकदारांकडून खरेदी जोर दिसला
मुळे बाजार सुरू होताच सेन्सेक्स आणि निफ्टीत मोठी तेजी दिसून आली
प्री-ओपनिंग सत्रात सेन्सेक्स आणि निफ्टी वधारले होते
आज, सकाळी बाजारातील व्यवहारांना सुरुवात झाली तेव्हा मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 58,162.74 अंकांवर
राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 17,322.30 अंकांवर खुला झाला
सकाळी 9.30 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स 973 अंकांनी वधारत 58,208.43 अंकावर
निफ्टी 278 अंकांनी वधारत 17,292.35 अंकांवर व्यवहार करत होता
निफ्टी बँक इंडेक्स 2.22 टक्के, निफ्टी आयटीमध्ये 2.24 टक्क्यांची तेजी दिसून आली
निफ्टी 50 मधील सर्व 50 कंपन्यांच्या शेअरमध्ये तेजी दिसून आली