कसोटी कर्णधार म्हणून सर्वाधिक दुहेरी शतकं

विराट कोहलीच्या नावावर कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतक झळकावण्याचा विक्रम आहे.

Published by: जयदीप मेढे
Image Source: PTI

कोहलीनं 123 सामन्यांच्या 210 डावांमध्ये 9230 धावा केल्या, ज्यामध्ये त्यानं 7 वेळा द्विशतकी खेळी खेळली.

Image Source: PTI

विराट कोहलीने त्याच्या कसोटी कारकिर्दीच्या पहिल्या पाच वर्षांत एकही द्विशतक झळकावलं नाही, पण 2016 पासून त्यानं 7 वेळा द्विशतक झळकावलं आहे.

Image Source: PTI

कसोटी क्रिकेटमध्ये 7 वेळा द्विशतक करणारा तो एकमेव भारतीय कसोटी कर्णधार आहे.

Image Source: PTI

कसोटी कर्णधार म्हणून जिंकले भारतासाठी सर्वाधिक सामने

विराट कोहलीनं कसोटी सामन्यांमध्ये भारताचं नेतृत्व करताना 68 सामने खेळले आणि 40 सामन्यांमध्ये संघाला विजय मिळवून दिला, तर 17 सामन्यांमध्ये संघाला पराभवाचा सामना करावा लागला.

Image Source: PTI

किंग कोहलीनं भारताचं नेतृत्व करताना सर्वाधिक कसोटी सामने जिंकलेत. त्याच्यानंतर एमएस धोनीचा नंबर लागतो.

Image Source: PTI

ज्यानं भारताचं नेतृत्व करताना 60 पैकी 27 कसोटी सामन्यांमध्ये संघाला विजय मिळवून दिला आहे. अशा परिस्थितीत कोहलीचा हा विक्रम क्वचितच मोडता येईल.

Image Source: PTI

भारतीय कर्णधार म्हणून सर्वाधिक कसोटी सामने खेळले

विराट कोहलीनं कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामन्यांमध्ये भारतीय संघाचं नेतृत्व केलं आहे.

Image Source: PTI

कोहलीनं 68 सामन्यांमध्ये भारताचं नेतृत्व केलं, ज्यामध्ये संघानं 40 सामने जिंकले आणि 17 सामने गमावले तर 11 सामने अनिर्णित राहिले. कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा विजयाचा टक्का 58.82 टक्के होता.

Image Source: PTI

कोहलीसारखा कर्णधारपदाचा रेकॉर्ड रचणं 'मुमकीन नहीं ना मुमकीन.

इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेत विजय मिळवणारा विराट कोहली हा एकमेव कसोटी कर्णधार आहे.

Image Source: PTI

देशांत कसोटी सामना जिंकणारा एकमेव भारतीय कर्णधार

SENA - दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया विराट हा SENA देशांमध्ये सर्वाधिक कसोटी जिंकणारा आशियाचा नंबर एक कर्णधार आहे.

Image Source: PTI

विराटच्या नेतृत्वाखाली टीम इंडियानं घरच्या मैदानावर 31 पैकी 24 सामने जिंकले आणि 2 सामने गमावले,

Image Source: PTI

तर धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियानं 30 सामने जिंकले आणि 21 सामने गमावले. कर्णधार म्हणून रोहितनं 16 पैकी 10 सामने जिंकले आणि 5 सामने गमावले.

Image Source: PTI

परदेशातील मैदानांमध्ये टीम इंडियाचं नेतृत्व करताना विराटनं 36 पैकी 16 सामने जिंकले

Image Source: PTI

तर 15 सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियानं परदेशात 30 पैकी फक्त 6 सामने जिंकले, 15 सामने गमावले आणि 9 सामने अनिर्णित राहिले.

Image Source: PTI

रोहितच्या नेतृत्वाखाली टीम इंडियानं 5 पैकी 2 सामने जिंकले आणि 2 सामन्यांमध्ये पराभव पत्करावा लागला, तर एक सामना अनिर्णित राहिला.

Image Source: PTI

टीम इंडियाच्या कसोटी संघाचा कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा

भारतीय कर्णधार म्हणून कोहलीनं कसोटीत सर्वाधिक धावा केल्या आहेत.

Image Source: PTI

विराटने 20 शतकांसह 5864 धावा केल्या. त्याच्यापेक्षा जास्त काळ कोणीही भारतीय संघाचं नेतृत्व केलेलं नाही. खेळाडूला इतक्या धावा करता आल्या नाहीत.

Image Source: PTI