अभिनेत्री श्वेता तिवारी ही 'स्मॉल स्क्रीन क्वीन' म्हणून ओळखली जाते. श्वेता तिवारीकडे पाहून कोणी म्हणणार नाही की तिला 22 वर्षांची मुलगी आहे. खरं तर, अभिनेत्रीला पाहून तिच्या वयाचा अंदाज लावता येत नाही. 42 वर्षीय श्वेताला पाहून फॅन्स तिच्या स्टाइलचे चाहते झाले आहेत. श्वेता तिवारी हिने टीव्ही मालिकांमध्ये एक मोठा काळ गाजवला आहे. कसौटी जिंदगीमधून लोकप्रियता मिळवलेली श्वेता तिवारी बिग बॉसची विजेतीही आहे. श्वेता तिवारीने 2011 मध्ये सलमान खानच्या शो बिग बॉस सीझन 4 ची चमकदार ट्रॉफी जिंकली होती. यानंतर श्वेता तिवारीच्या कारकिर्दीचा आलेख आकाशाला भिडू लागला.