बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान (Shah Rukh Khan) हा राजकुमार हिरानीच्या डंकीच्या शूटिंगमध्ये व्यस्त होता.



शाहरुख, तापसी पन्नू (Taapsee Pannu) आणि या चित्रपटातील इतर कलाकार हे डंकी चित्रपटाच्या शूटिंगसाठी काश्मीरला गेले होते.



चित्रपटाच्या शूटिंगचा काही भाग पूर्ण करुन आता डंकी चित्रपटाची टीम मुंबईत आली आहे.



शाहरुख हा नुकताच मुंबई विमानतळावर स्पॉट झाला.



मुंबई एअरपोर्टवरील शाहरुखचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.



एका व्हायरल व्हिडीओमध्ये शाहरुखसोबत सेल्फी काढण्यासाठी लोकांनी केलेली गर्दी दिसत आहे.



व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे की, सेल्फी काढायला आलेल्या एका व्यक्तीच्या हाताला शाहरुख हा धक्का देतो. त्या व्यक्तीला नंतर बॉडीगार्ड्स ढकलतात.



व्हायरल व्हिडीओमधील शाहरुखचं हे वर्तन पाहून नेटकरी भडकले आहेत.



एअरपोर्टवरील शाहरुखच्या व्हायरल व्हिडीओला एका नेटकऱ्यानं कमेंट केली, 'उगाच अॅटिट्युड दाखवत आहे.'



शाहरुख लवकरच जवान आणि डंकी या चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.