अभिनेत्री सारा अली खान ही हे सध्या तिच्या 'जरा हटके जरा बचके' या चित्रपटाचे प्रमोशन करत आहेत.
काही दिवसांपूर्वी सारा ही मध्य प्रदेशातील उज्जैन येथील महाकाल मंदिरात गेली. त्यावेळी सारानं महाकाल देवाचे दर्शन घेऊन प्रार्थना केली आहे.
सारानं मंदिरात जाऊन दर्शन घेतल्यानंतर सोशल मीडियावर काही जणांनी तिला ट्रोल केलं.
साराला ट्रोलर्सबाबत एका मुलाखतीमध्ये विचारण्यात आलं.
त्यावर सारा म्हणाली, 'मी माझे काम खूप गांभीर्याने करते. मी लोकांसाठी काम करते. तुम्हाला माझे काम आवडत नसेल तर मला वाईट वाटेल पण माझ्या वैयक्तिक आयुष्यात काय करायचं हे मी ठरवेल.'
पुढे सारानं सांगितलं, 'ज्या भक्तिभावाने मी बंगला साहिब किंवा महाकालला जाईन त्याच भक्तीने मी अजमेर शरीफला जाणार आणि मी तिथे जात राहीन. लोकांना जे म्हणायचंय ते म्हणू देत, मला काही अडचण नाही.'
सारानं दिलेल्या या उत्तराचं अनेक जण सोशल मीडियावर कौतुक करत आहेत.
सारा आणि विकी यांच्या 'जरा हटके जरा बचके' हा विकी आणि साराचा चित्रपट 2 जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
साराचा चाहता वर्ग मोठा आहे.
साराच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात.