सांगली जिल्ह्यातील मिरजेच्या (sangli Miraj Ganesh Utsav) प्रसिद्ध गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी स्वागत कमानी सज्ज झाल्या आहेत. विसर्जन मिरवणुकीवेळी भव्य अश्या स्वागत कमानी उभारण्याची मागील बेचाळीस वर्षांपासूनची परंपरा आहे. मिरवणुकी साठी गणेश मंडळांनी जय्यत तयारी केली आहे. धार्मिक, पौराणिक, ऐतिहासिक आणि सामाजिक विषयावरील चित्रण या कमानीवर लावण्यात येते. सांगली जिल्ह्यातील मिरजेच्या गणेश उत्सवाला शंभर वर्षांची परंपरा आहे. अनंत चतुर्दशीला निघणाऱ्या येथील विसर्जन मिरवणुकीसाठी अनेक राज्यातून भाविक मोठ्या संख्येने येतात. गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी गणेश मंडळांनी जय्यत तयारी केली आहे. मिरज शहरात गेल्या 42 वर्षापासून भव्य आणि आकर्षक स्वागत कमानी उभारण्यात येतात. धार्मिक, पौराणिक, ऐतिहासिक आणि सामाजिक विषयावरील चित्रण या वर लावण्यात येते.