दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवीने अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलंय. साई पल्लवीचा लूक जरी सिंपल असला तरी या साध्या लूकमुळे तिने अनेकांना वेडं बनवलंय. केवळ 30 वर्षाच्या असणाऱ्या या अभिनेत्रीने अनेक हिट चित्रपट दिले आहेत. तिचा 'प्रेमम' हा पहिलाच चित्रपट सुपर-डूपर हिट ठरला. त्यात साकारलेली 'मलर' ही भूमिका अनेकांच्या काळजात घर करुन आहे. साई पल्लवीने आतापर्यंत तामिळ, तेलुगू आणि मळ्यालम चित्रपटांत काम केलं आहे. तिने मारी सारखा सुपरहिट चित्रपटही दिला आहे. साई पल्लवी कोणत्याही सौंदर्यप्रसाधनाच्या जाहिरातीत काम करत नाही. एका फेअरनेस क्रिमच्या जाहिरातीसाठी साईला दोन कोटी रूपयांची ऑफर होती. परंतु त्या जाहिरातीमध्ये तिनं काम करण्यास नकार दिला.