दिवंगत अभिनेते ऋषी कपूर (Rishi Kapoor) यांची आज दुसरी पुण्यतिथी आहे. बॉलिवूडमध्ये त्यांची ओळख रोमँटिक अभिनेता म्हणून निर्माण झाली होती.
आज ते जरी आपल्यात नसले तरी, त्यांच्या धमाकेदार चित्रपटांमुळे ते कायम प्रेक्षकांच्या हृदयात राहतील.
ऋषी कपूर यांनी मोठ्या पडद्यावर अनेक अभिनेत्रींसोबत काम केले. परंतु, नीतू कपूरसोबतची त्यांची रील आणि रियल लाईफ जोडी प्रेक्षकांना सर्वाधिक आवडली.
खऱ्या आयुष्यातही ही जोडी हिट ठरली. दोघांनीही अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले होते.
दो दूनी चार : हा एक फॅमिली कॉमेडी ड्रामा चित्रपट होता. यामध्ये अभिनेता ऋषी कपूर यांनी एका शिक्षकाची भूमिका साकारली होती. हा शिक्षक आर्थिक समस्या असूनही, पत्नी आणि मुलांना आनंदी ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतो.
अनजाने मे : या चित्रपटात ऋषी कपूर आणि नीतू कपूर यांच्या प्रमुख भूमिका होत्या. याचे दिग्दर्शन समीर गांगुली यांनी केले होते.
कभी कभी : या चित्रपटाच्या सेटवरच ऋषी कपूर आणि नीतू कपूर यांच्यात प्रेम फुलले, असे म्हटले जाते. या चित्रपटानंतर दोघांमधील जवळीक अनेक चित्रपटांमध्ये पाहायला मिळाली.
लव्ह आज कल : या चित्रपटाद्वारे नीतू कपूर यांनी 26 वर्षांच्या ब्रेकनंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन केले. या चित्रपटात ऋषी कपूर यांनी ‘वीर सिंह’ ही भूमिका साकारली होती. नीतू कपूर देखील यात एका छोट्या भूमिकेत दिसल्या होत्या.
बेशरम : ऋषी कपूर यांनी 2013मध्ये आलेल्या ‘बेशरम’ या चित्रपटात इन्स्पेक्टर ‘चुलबुल चौटाला’ची भूमिका साकारली होती. तर, नीतू कपूर यांनी त्यांच्या पत्नी हेड कॉन्स्टेबल ‘बुलबुल चौटाला’ची भूमिका साकारली होती. विशेष म्हणजे या चित्रपटात त्यांचा मुलगा रणबीर कपूरनेही काम केले आहे.
खऱ्या आयुष्यातही ही जोडी हिट ठरली. दोघांनीही अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले होते.