1

तांदळच्या पाण्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे, कॅल्शियम मोठ्या प्रमाणात आढळतात. (Photo Credit : unsplash)

2
चांगला तांदूळ १ वेळा पाण्यात स्वच्छ धुवा आणि त्यानंतर तो तांदूळ काही वेळासाठी पाण्यात भिजवून ठेवा.पाण्यात जो स्टार्च शिल्लक राहतो त्याला 'तांदळाचे पाणी' म्हणतात. (Photo Credit : unsplash)


3

तांदळाचे पाणी क्लिन्झर, टोनर, सीरम इत्यादी प्रकारे आपण वापरू शकतो. (Photo Credit : unsplash)

4

तांदळाच्या पाण्यामुळे त्वचेची पोत सुधारते आणि त्वचा निरोगी राहते. (Photo Credit : unsplash)

5

चेहरा स्वच्छ करण्यासाठी तांदळाचे पाणी वापरल्याने सुरकुत्या,वृद्धत्वाची लक्षणे, काळे डाग, चट्टे,पिंपल्स कमी होतात. (Photo Credit : unsplash)

6

तांदळाच्या पाण्यामुळे त्वचेचं मृत पेशींपासून संरक्षण होते. (Photo Credit : unsplash)

7

चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येण्यासाठी आणि चेहरा तजेलदार, मुलायम होण्यासाठी तांदळाच्या पाण्यामध्ये थोडे बर्फाचे तुकडे घाला. (Photo Credit : unsplash)

8

तांदळाच्या पाण्यामध्ये 'व्हिटॅमिन ई' तेल मिसळून त्याचा वापर आपण 'सीरम' म्हणून करू शकतो. (Photo Credit : unsplash)

9

कोरफडीचा गर तांदळाच्या पाण्यात घालून तो 'फेस पॅक' चेहऱ्यावर लावल्यास त्वचा निरोगी राहते. (Photo Credit : unsplash)

10

तांदळाच्या पाण्यामध्ये गुलाबपाणी आणि मध टाकून त्याचा वापर आपण 'टोनर' म्हणून करू शकतो. (Photo Credit : unsplash)

Image Source: (Photo Credit : unsplash)

वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. (Photo Credit : unsplash)