राजकुमारने पटकावला 40 अंडर 40 इन बॉलीवुड सन्मान!
बॉलीवूडचा पॉवरहाऊस परफॉर्मर म्हणून राजकुमार राव ओळखला जातो
नुकताच त्याने 40 अंडर 40 हा खास अवॉर्ड मिळवला
या प्रतिष्ठित पुरस्काराने राजकुमार एक नवखा आणि तितकाच सर्वोत्कृष्ट अभिनेता ठरला
अभिनेता राजकुमार रावचा हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रवास उल्लेखनीय आहे.
2010 मध्ये त्याच्या बॉलीवुड मधल्या पदार्पणापासून तो
झपाट्याने काम करून बॉलिवूड स्टारडमच्या शिखरावर पोहोचला आहे.
प्रत्येक कामाने त्याने तो अभिनेता म्हणून कसा उत्तम आहे हे दाखवून दिलं.
2023 हे वर्ष अभिनेता राजकुमार राव साठी सेलिब्रेटिंग वर्ष ठरतंय यात शंका नाही!
राजकुमार ला पुन्हा ऑन-स्क्रीन बघण्यासाठी आता सगळ्यांना उत्सुकता आहे.