मराठी चित्रपटसृष्टीमधील प्रसिद्ध अभिनेत्री भाग्यश्री मोटे (bhagyashree mote) ही सोशल मीडियावरील तिच्या पोस्टमुळे चर्चेत असते. भाग्यश्री ही वेगवेगळ्या लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करते. तिचे फोटो हे नेहमी चाहत्यांचे लक्ष वेधतात. तसेच नेटकरी तिच्या फोटोवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करतात. सोशल मीडियावर तिचे लाखो फॉओअर्स आहेत. काही दिवसांपूर्वीच भाग्यश्रीनं तिच्या आयुष्यातील 'स्पेशल' व्यक्तीबाबतची माहिती चाहत्यांना दिली होती. भाग्यश्री ही मेक-अप डिझायनर असलेल्या विजय पालांडे (Vijay Palande) सोबत साखरपुडा झाला आहे. चिकाटी गडिलो चिथा कोटूडू या तेलगू सिनेमातून भाग्यश्रीनं दाक्षिणात्य इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केलं. देवयानी ही तिची पहिली मराठी मालिका होती. भाग्यश्रीचा मराठी सिनेमा क्षेत्रातला पदार्पणाचा सिनेमा 'शोधू कुठे' हा होता. भाग्यश्रीने काय रे रास्कला, पाटील, माझ्या बायकोचा प्रियकर, विठ्ठल, मुंबई मिरर या सिनेमांमध्ये काम केलं आहे. आता तिचा एकदम कडक हा सिनेमा येतोय. यामध्ये सैराटमधील अरबाज शेख, तानाजी गळगुंडे हे कलाकार आहेत.