Mahindra XUV700 मध्ये 2.0 लीटरचे mStallion पेट्रोल इंजिन आहे. 2.0 लिटरचे mHawk डिझेल इंजिनचाही पर्याय उपलब्ध आहे. 53bhp पेक्षा जास्त क्षमता आणि 420Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. XUV700 ही कार एकदम आकर्षक दिसत असून ही लॉंच होणे हा अनेक महिन्यानंतर ग्राहकांना सुखद धक्का आहे. कारमध्ये आत जाताना सीट मागे सरकते. हे फिचर्स ग्राहकांच्या चांगलेच पसंतीस उतरले आहे. कारच्या छतावर सोनी कंपच्या 12 स्पीकर्ससह 3D सिस्टीम आहे. ड्युअल-झोन क्लायमेट कंट्रोलमुळे उन्हामध्ये केबिन लगेच थंड होते. सुरक्षिच्या दृष्टीकोनातून विचार केला तर ही कार अत्यंत सुरक्षित आहे. यात 7 एअरबॅग्ज, स्टेयरिंग व्हील बटणांसह एक ADAS प्रणाली आहे. स्टेयरिंग खूप हलके आहे. त्यामुळे कार सहज पार्क करण्यास मदत होते.