ब्राऊन राइस आणि पांढऱ्या तांदळात नेमका काय फरक?

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: pexels

तुम्ही सुद्धा भात खाण्याचे शौकीन आहात आणि वजन वाढण्याची भीती वाटते?

Image Source: pexels

आपल्या आरोग्यासाठी कोणता तांदूळ सर्वोत्तम आहे, ते जाणून घेऊया.

Image Source: pexels

ब्राउन राइस एक अख्खा धान्य आहे, तर पांढरा तांदूळ प्रक्रिया करून त्याची वरची बाजू काढली जाते.

Image Source: pexels

पांढऱ्या तांदळाला गिरणीत जास्त पॉलिश केले जाते, ज्यामुळे त्याचे बहुतेक पोषक तत्व नष्ट होतात.

Image Source: pexels

ब्राऊन तांदळात पांढऱ्या तांदळाच्या तुलनेत खूप जास्त फायबर असतं, ज्यामुळे पचनक्रिया चांगली राहते.

Image Source: pexels

पांढऱ्या तांदळाचा ग्लायसेमिक इंडेक्स (जीआय) जास्त असतो, तर ब्राऊन तांदळाचा जीआय कमी असतो.

Image Source: pexels

ब्राऊन राइसमध्ये कमी जीआय (GI) असल्याने, तो मधुमेहाच्या रुग्णांसाठी एक उत्तम पर्याय मानला जातो.

Image Source: pexels

दोघांमध्ये कॅलरी आणि कार्बोहायड्रेटची मात्रा जवळपास सारखीच असते, पण पोषक तत्वांच्या बाबतीत ब्राऊन राइस (तांदूळ) सरस आहे.

Image Source: pexels

दोन्ही प्रकारचे तांदूळ नैसर्गिकरित्या ग्लूटेन-मुक्त असतात

Image Source: pexels

पोषणाच्या दृष्टीने पांढऱ्या तांदळाच्या तुलनेत ब्राऊन राईस अधिक आरोग्यदायी आणि पौष्टिक मानला जातो.

Image Source: pexels