घरात पापडाची टेस्टी भाजी कशी बनवायची?

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: pexels

घरी पापडाची स्वादिष्ट भाजी बनवणं खूप सोपं आहे.

Image Source: pexels

4 ते 5 मुगाच्या डाळीचे पापड घेऊन ते गॅसवर किंवा तव्यावर चांगले भाजून घ्या आणि त्याचे तुकडे करा.

Image Source: pexels

एका वाडग्यात एक चमचा दही घ्या आणि त्यात हळद, लाल तिखट, धने पावडर घालून पेस्ट तयार करा.

Image Source: pexels

कढईत तूप किंवा तेल गरम करून जिरे, मोहरी, हिंग, बारीक चिरलेला लसूण, आले आणि हिरवी मिरचीचा तडका द्या.

Image Source: pexels

गॅसची आंच मंद करून त्यात दहीचे मिश्रण घाला आणि नीट शिजवा.

Image Source: pexels

मसाला आणि तेल टाकल्यानंतर त्यात बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो आणि गाजर घालून २-३ मिनिटे परतून घ्या.

Image Source: pexels

आता यात चवीनुसार मीठ घाला, लक्षात ठेवा की पापडातही मीठ असतं, त्यामुळे जपून घाला.

Image Source: pexels

आता यात पापडाचे तुकडे टाका, ते फक्त १ मिनिट शिजवा आणि लगेच गॅस बंद करा.

Image Source: pexels

वरतून गरम मसाला आणि हिरवी कोथिंबीर घालून रोटी किंवा पराठ्यासोबत सर्व्ह करा.

Image Source: pexels