लहान मुलांचा मेंदूचा विकास होण्यासाठी 1 ते 5 वर्षा हे खुप महत्त्वाचे असते. या कालावधीत ते लहान मुले दुसऱ्या व्यक्तीला बघून आणि ऐकुण सर्व शिकत असतात.
1 ते 5 या वर्षाच्या कालावधीत मुलांसाठी पालकांचा खुप महत्त्वाचा क्षण असतो. जर पालकांनी लक्षपुर्वक जपले तर त्यावेळेत मुलांचा बुध्दीचा विकास चांगल्याप्रकारे होतो.
लहान मुलांच्या बुध्दीला तीक्ष्ण करण्यासाठी त्यांना खाण्यासोबत काही शारिरिक खेळ किंवा उपक्रम करणे हे सुध्दा गरजेचे असते. जे त्यांच्या रोजच्या दैनंदिन जीवनात असायला हवे.
लहान मुलांची बुध्दी तीक्ष्ण करण्यासाठी त्यांना पुस्तके वाचण्यासाठी शिकवले पाहिजे.
लहान मुलांसाठी अनेक प्रकारचे पझल्स गेम येतात, तर त्यांना ते खेळण्यासाठी शिकवा, यामुळे बुध्दीला खुप चालना मिळते.
मुले घरातच खेळ खेळली नाही पाहिजे त्यासोबतच त्यांनी बाहेरचे मैदानी खेळ सुध्दा खेळायला पाहिजे. त्यामुळे त्यांची शरिराची वाढ चांगल्या प्रकारे होते.
लहान मुले सर्व समजण्याचा प्रयत्न करत असतात, त्यावेळी त्यांना गाणी ऐकण्यासाठी प्रभुत्व करा यामुळे त्यांना शांत आणि ताजेतवान वाटेल.
लहान मुलांनी सायकल चालवणे हे त्यांच्या साठी खुप चांगले असते, व त्यांच्या शरिराची वाढ चांगल्याप्रकारे होते.
लहान मुलांना तुमच्या सोबत योगा किंवा मेडिटेशन सारख्या गोष्टी करण्यासाठी शिकवा. यामुळे त्यांच्या बुध्दीवर चांगला प्रकाश पडतो यामुळे त्यांची बुध्दी खुप तीक्ष्ण होते.