बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी आणि क्रिकेटर केएल राहुल अखेर लग्नबंधनात अडकले आहेत.

सुनील शेट्टीच्या खंडाळ्यातील फार्महाऊसवर त्यांनी लग्न केलं आहे.

अथिया आणि केएल राहुल फक्त 100 पाहुण्यांच्या उपस्थितीत लग्नबंधनात अडकले आहेत.

लग्नानंतर केएल आणि अथियाने मनोरंजन आणि क्रिकेटविश्वातील मंडळींसाठी खास भव्य रिसेप्शनचं आयोजन केलं आहे.

अथिया आणि केएल राहुलचं रिसेप्शन आयपीएलनंतर (IPL) होणार आहे.

सुनील शेट्टी यांच्या 'जहान' बंगल्यात 23 जानेवारी 2023 रोजी दुपारी 4.00 वाजता अथिया शेट्टी आणि केएल राहुल लग्नाच्या बेडीत अडकले आहेत.

कुटुंबीय आणि जवळच्या मित्र-मंडळींच्या उपस्थितीत त्यांचा लग्नसोहळा पार पडला आहे.

अथिया-राहुल गेल्या चार वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते.

चार वर्षे अथियाला डेट केल्यानंतर अखेर आज केएल राहुल बोहल्यावर चढला आहे.

केएल राहुल आणि अथियाने सोशल मीडियावर लग्नसोहळ्याचे फोटो शेअर केले आहेत.