अभिनेत्री करीना कपूर (Kareena Kapoor) सध्या तिच्या लाला सिंह चड्ढा (Laal Singh Chaddha) या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे.
करीनाच्या या चित्रपटाला सध्या सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे. करीना आणि अभिनेता आमिर खान हे सध्या लाला सिंह चड्ढा या चित्रपटाचं प्रमोशन करत आहेत.
एका मुलाखतीमध्ये करीनाला सीता: द इनकार्नेशन या चित्रपटामधील तिच्या भूमिकेबद्दल आणि तिनं घेतलेल्या मानधनाबाबत प्रश्न विचारण्यात आले. यावेळी करीनानं दिलेल्या उत्तरानं अनेकांचे लक्ष वेधले.
गेल्या काही दिवसांपासून अशी चर्चा सुरु आहे की, सीता ही भूमिका करीना साकारणार आहे.
एका रिपोर्टनुसार, बाहुबली या ब्लॉकबस्टर चित्रपटाचे लेखक विजयेंद्र प्रसाद हे सीता: द इनकार्नेशन या चित्रपटाचं शूटिंग करणार आहेत.
एका रिपोर्टनुसार सीता ही भूमिका साकारण्यासाठी करीनानं 12 कोटींची मागणी केली. ज्यामुळे तिला अनेकांनी ट्रोल केलं.
सर्व गोष्टींवर करीनानं प्रतिक्रिया दिली की, या चित्रपटाची तिला ऑफर देखील आली नाही.
पुढे करीना म्हणाली, मी या गोष्टीचं कधी स्पष्टीकरण दिलं नाही. कारण मला या भूमिकेची ऑफर देण्यात आली नाही. मला माहित नाही लोक या चर्चा का करत आहेत. हे खोटं आहे.'
मला या चित्रपटाची कोणतीही माहिती मिळाली नाही. मला वाटतं बॉलिवूडमध्ये चांगल्या अभिनेत्री आहेत, ज्या या भूमिकेमध्ये फिट होऊ शकतील.
लाल सिंह चड्ढा हा चित्रपट 11 ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.