1947 मध्ये देशाला स्वातंत्र्य मिळाले, परंतु १९४६ चा रॅायल इंडियन नेव्ही विद्रोह तुम्हाला माहितीये का?
या घटनेला भारताच्या स्वातंत्र्यासाठीचा शेवटचा लढा म्हणूनही ओळखले जाते.
तो ब्रिटिश वसाहतवादी राजवटीविरुद्ध भारतीय खलाशांनी केलेला एक महत्त्वाचा उठाव होता.
मुंबई् येथील एचएमआयएस तलवार पासून हा उठाव कराची ते कलकत्ता पर्यंत संपूर्ण ब्रिटिश भारतात पसरला आणि त्याला पाठिंबा मिळाला.
यामध्ये ५६ जहाजे आणि किनाऱ्यावरील १०,००० हून अधिक खलाशांचा समावेश होता.
सलील श्याम, बी.सी.दत्त, मदन सिंग ऋषी देव पुरी आणि एम.एस. खान हे बंडाचे नेते होते.
२०० हून अधिक लोक मृत्युमुखी पडले आणि १००० हून अधिक लोक जखमी झाले, ७ खलाशी आणि १ कमांडर मारला गेला. या बंडामुळे ४७६ खलाशांना नोकरीवरून काढून टाकण्यात आले.