मेष - आज कौटुंबिक संमती मिळाल्याने प्रेमसंबंधही अधिक घट्ट होतील. तुम्ही भविष्यातील अनेक योजना प्रत्यक्षात आणू शकाल.



वृषभ - आज ग्रहांचे संक्रमण तुमच्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण करत आहे. रखडलेल्या कामांना गती मिळेल. तुमचे मनोबलही वाढेल.



मिथुन - ज्येष्ठ नागरिकांचा सल्ला व मार्गदर्शनाचे पालन करावे. त्यांचे सहकार्य तुमच्यासाठी प्रेरणादायी ठरेल. अनावश्‍यक खर्चाला आळा घालणेही गरजेचे आहे.



कर्क - आज तुम्ही प्रत्येक काम पूर्ण मेहनत घेऊन पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल. तुम्हाला यश मिळेल, जवळच्या मित्राच्या सहकार्याने तुमचे धैर्य वाढेल.



सिंह  - आज घरात शिस्तबद्ध आणि आनंददायी वातावरण राहील. प्रेमसंबंधांसाठी घरच्यांच्या संमतीने लग्नाचे बेत आखले जातील. तब्येत ठीक राहील.



कन्या - आजचा दिवस काहीसा संमिश्र जाईल. शहाणपणाने आणि चातुर्याने तुम्ही प्रतिकूल परिस्थितीवर मात कराल. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाशी संबंधित कोणताही अडथळा दूर होईल



तूळ - आज आर्थिक स्थितीमुळे तुम्ही चिंतीत असाल. तुमचे बजेट संतुलित ठेवण्यातही तुम्ही यशस्वी व्हाल. आपल्या क्षमतेवर विश्वास ठेवून पुढे जात राहा.



वृश्चिक - आज धार्मिक व अध्यात्मिक कार्यात रुची राहील. तुमचा तत्वनिष्ठ दृष्टिकोन तुम्हाला समाजात आदराचे वातावरण देईल. अनुभवी व्यक्तीकडून योग्य सहकार्यही मिळेल.



धनु - आज काही समस्यांना तोंड द्यावे लागत असले तरी, आपण सकारात्मक दृष्टिकोन आणि संतुलित विचाराने पुढे जाल आणि आपली कामे वेळेवर पूर्ण करू शकाल



मकर - आज ग्रहांची स्थिती खूपच समाधानकारक आहे. प्रत्येक काम शांततेने पूर्ण होईल. जे काही लोक तुमच्या विरोधात होते, त्यांच्यासमोर तुमचे निर्दोषत्व सिद्ध होईल.



कुंभ - आज व्यवहारी राहणेही महत्त्वाचे आहे. जास्त आदर्शवाद तुमच्या स्वतःसाठी हानिकारक असू शकतो. आज मनःस्थिती काहीशी विचलित होईल.



मीन - आज उधार किंवा रखडलेले पैसे परत मिळतील. आर्थिक समस्या सुटल्याने दिलासा मिळेल. कोणत्याही धार्मिक स्थळी गेल्याने तुम्हाला मनःशांती मिळेल