फर्टिलिटी टेस्ट कोणत्या वयात करायला हव्यात?

Published by: श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई
Image Source: pexels

प्रजनन क्षमता चाचणी ही प्रक्रिया आहे, जी पुरुष आणि स्त्रिया दोघांच्याही पुनरुत्पादक क्षमतेबद्दल माहिती देते.

Image Source: pexels

यामुळे, गरोदरपणात येणाऱ्या अडचणी अधिक चांगल्या प्रकारे समजून घेता येतील.

Image Source: pexels

फर्टिलिटी टेस्ट कोणत्या वयात करायला हव्यात? सजविस्तर जाणून घेऊयात...

Image Source: pexels

खरं तर, फर्टिलिटी टेस्ट (Fertility Test)करण्यासाठी योग्य वेळ वयावर अवलंबून असते.

Image Source: pexels

35 वर्षांपेक्षा कमी वयाच्या स्त्रिया 12 महिन्यांपर्यंत प्रयत्न करुनही गर्भ धारणा झाली नाही तर टेस्ट करू शकता.

Image Source: pexels

35 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या स्त्रियांनी 6 महिन्यांनंतर टेस्ट करावी.

Image Source: pexels

चाळीस वर्षांपेक्षा जास्त वयाच्या महिला तीन महिन्यांनी किंवा कसलाही प्रयत्न न करता तपासणी करू शकतात.

Image Source: pexels

पुरुषांना फर्टिलिटी टेस्ट (Fertility Test) करण्यासाठी काही निश्चित वेळ नाही.

Image Source: pexels

पण 35 वर्षांनंतर किंवा काही आजार असल्यास, त्यांनी फर्टिलिटी टेस्ट (Fertility test) करून घेणं आवश्यक आहे.

Image Source: pexels

टिप : वरील सर्व बाबी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतीही टेस्ट करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.