बदाम की अक्रोड, मेंदू तल्लख बनवण्यासाठी अधिक फायदेशीर काय?

Published by: अनिरुद्ध जोशी
Image Source: pexels

बदाम आणि अक्रोड दोन्ही आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ड्रायफ्रुट्स आहेत.

Image Source: pexels

हे दोन्ही मेंदूसाठी अत्यंत उपयुक्त मानले जातात. यामध्ये मेंदूला अधिक सक्रिय व तीक्ष्ण बनवणारी पोषक तत्त्वे आढळतात.

Image Source: pexels

बदाम आणि अक्रोड खाल्ल्याने मेंदूला आवश्यक पोषकतत्व मिळतात.

Image Source: pexels

बदाम किंवा अक्रोड, मेंदूला तल्लख बनवण्यासाठी काय जास्त फायदेशीर आहे? हे जाणून घेऊया.

Image Source: pexels

अक्रोडच्या खाल्ल्याने मेंदूचा विकास अधिक चांगल्या प्रकारे होतो, तसेच स्मरणशक्ती वाढवण्यासाठी अक्रोड अत्यंत प्रभावी मानले जाते.

Image Source: pexels

अक्रोडमध्ये ओमेगा-3 फॅटी ऍसिड भरपूर प्रमाणात असते. हे फॅटी ऍसिड मेंदूच्या पेशींना मजबूत बनवते.

Image Source: pexels

यामध्ये अँटिऑक्सिडंट आणि पॉलीफेनॉल देखील आढळतात. हे घटक मेंदूला फ्री रॅडिकल्सपासून वाचवतात.

Image Source: pexels

बदाममध्ये व्हिटॅमिन ई आणि मॅग्नेशियम असतं, ही पोषक तत्वेही मेंदूच्या आरोग्यासाठी आवश्यक आहेत.

Image Source: pexels

बदाम देखील बऱ्यापैकी स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढविण्यात मदत करतात.

Image Source: pexels