रोज केळी खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे होतात. अनेकांना कच्ची केळी खाण्याचे काय फायदे आहेत, हे कदाचित माहित नसावं. कच्च्या केळांमध्ये पोटॅशियमचा खजाना असतो. रोगप्रतिकारक शक्ती आणखी सक्षम करण्यासोबतच दिवसभर उत्साह टिकून राहण्यास मदत मिळते. वजन घटवण्याचा अटोकाट प्रयत्न करणारे केळी खाणं टाळतात. मात्र कच्ची खेळी खाल्ल्यामुळे वजन घटवण्यास मदत होते. बद्धकोष्ठतेचा त्रास असेल तर रोज कच्चं केळ खाणं फायदेशीर ठरू शकतं. कच्च्या केळामुळे भूख नियंत्रित करणं, शांत करण्यास मदत मिळते. मधुमेहाचा त्रास असणाऱ्या रुग्णांनाही कच्ची केळी फायदेशीर ठरू शकते. मधुमेह प्राथमिक स्तरावर असेल, तर कच्ची केळी खाणं सुरु करा.