अभिनेता हार्दिक जोशी (Hardeek Joshi) आणि अभिनेत्री अक्षया देवधर (Akshaya Deodhar) काही महिन्यांपूर्वी लग्नबंधनात अडकले आहेत.
लग्नानंतर हार्दिक आणि अक्षयाने जेजुरीच्या खंडोबाचं दर्शन घेतलं आहे.
हार्दिक आणि अक्षया लग्नानंतर पहिल्यांदाच जेजुरी गडावर गेले आहेत.
हार्दिक लाडक्या पत्नीला अर्थात अक्षयाला उचलून घेत जेजुरी गड चढताना दिसला आहे.
जेजुरीची पिढ्यांपिढ्या चालत असलेली खंडोबाची 42 किलोची खंडा तलवार हार्दिकनं एका दमात उचलली.
'येळकोट येळकोट जय मल्हार'च्या गजरात राणा दा आणि पाठकबाईंनी जेजुरीच्या खंडेरायाचं दर्शन घेतलं आहे.
राणा दा आणि पाठकबाईंचे जेजुरी गडावरचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
हार्दिक जोशी अर्थात लाडका राणा दा आणि पाठकबाई म्हणजेच अक्षय देवधरचा मोठा चाहतावर्ग आहे.
राणा दा आणि पाठकबाई ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय जोडी आहे.
राणा दा आणि पाठकबाईंच्या लग्नाला येत्या 2 डिसेंबरला त्यांच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण होणार आहे.