नवीन घरात गृहप्रवेशाचे मोठे महत्व आहे. गृहप्रवेशाची पूजा केल्याने घराचे वाईट नजरेपासून आणि नकारात्मक शक्तींपासून संरक्षण होते. नवीन घरात सकारात्मक उर्जेचा प्रवाह वाढतो. पूजा केल्याने देवतांचे आशीर्वाद मिळतात जे घरासाठी लाभदायी ठरतात. गृहप्रवेश पूजा केल्याने नऊ ग्रह प्रसन्न होतात. कुटुंबातील सदस्यांसाठी चांगले भाग्य, आरोग्य आणि समृद्धी या पूजामुळे मिळते. नवीन घराची आणि घरातील सदस्यांची भरभराट होऊ दे , हेच गृहप्रवेश पूजेचे मुख्य कारण आहे. गृहप्रवेशपूजेपूर्वी, स्वयंपाकासाठी स्टोव्ह आणि गॅसशिवाय घरात कोणतीही वस्तू आणणे टाळा. गृहप्रवेश पूजेसाठी घरात मंदिर बनवू शकता. पूजेनंतर घराचे सर्व फर्निचर आणि इतर वस्तू घरात घेऊन या. वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.