माळशिरसमध्ये बिरोबा यात्रेनिमित्त गोरडवाडी येथे शेळी मेंढी यात्रा महोत्सव भरवण्यात आला होता.



या यात्रेमध्ये शेळ्या-मेंढ्या सजवून बाजारात आणल्या होत्या.



बिरोबा यात्रेत महाराष्ट्रातून मेंढपाळ वर्ग दाखल झाला होता.



शेळ्या-मेंढ्यासाठी बाजारात विक्रीसाठी घुंगराचे पट्टे, घुंगरी, लोकर कातरण्यासाठी कात्री, सुती कापडाच्या रंगीबेरंगी छटणी विकण्यासाठी आल्या होत्या.



या यात्रेत अनेक प्रकारच्या शेळ्या आणि मेंढ्या होत्या.



चांगल्या किमती मिळत असल्याने शेतकऱ्यांनाही फायदा झाला.



हौशी लोक आवडीने मांडग्याळ आणि बिटल जातीचे बोकड आणि मेंढ्या खरेदी करत होते.



या बाजारामध्ये महाराष्ट्र आणि कर्नाटक परिसरातून जातिवंत शेळ्या मेंढ्या विक्रीसाठी आणल्या होत्या.



बाजारात फटाक्यांच्या आतषबाजीने तसंच गुलाल, भंडाऱ्याची उधळण करुन जल्लोष करण्यात आला.