‘बिग बॉस’च्या १३ व्या पर्वातून अभिनेत्री शहनाझ गिलने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली.
Published by: अदिती पोटे, एबीपी माझा
‘बिग बॉस’च्या १३ व्या पर्वातून अभिनेत्री शहनाझ गिलने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली.
अभिनेत्री शहनाज गिलला (Shehnaaz Gill) बिग बॉस-13 मधून प्रसिद्धी मिळाली. या शोमुळे ती चांगलीच लोकप्रिय झाली.
शहनाज गिल ही पंजाबी इंडस्ट्रीमधील मोठी अभिनेत्री आहे. तिने सत श्री अकाल इंग्लंड ( Sat Shri Akaal England), काला शाह काला, डाका, हौसला राख सारखे पंजाबी चित्रपट केले आहेत.
शहनाजने आतापर्यंत दोन बॉलिवूड चित्रपटात काम केले आहे. तिने 2023 मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
ती सलमान खानच्या 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटात दिसली होती. यानंतर शहनाज गिल थँक यू फॉर कमिंग या चित्रपटात दिसली.
शहनाजने नुकताच एक नवा लूक शेअर केला आहे, ज्यात ती एक साधा पण सुंदर लूकमध्ये दिसत आहे.
लाल ड्रेस आणि त्यावर न्यूड मेकअप करूंन शहनाज खूपच सुंदर दिसत आहे.
शहनाज गिलने 2015 मध्ये म्युझिक व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. यानंतर ती अनेक म्युझिक व्हिडिओ मध्ये झळकली होती. त्यानंतर तिला पंजाबी चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. 2019 मध्ये तिने बिग बॉसच्या 13 व्या सीझनमध्ये सहभाग घेतला होता.