सोशल मीडियावर चॅटिंग अधिक सोपी आणि जलद होण्यासाठी आपण मोठ्या प्रमाणात इमोजीचा वापर करतो.
शिगेताका कुरिता यांनी इमोजीचा शोध लावला असे मानले जाते.
कुरिता यांनी वयाच्या 25 व्या वर्षी त्यांचा पहिला इमोजी सेट तयार केला.
1999 मध्ये, NTT DOCOMO या जपानी सेल फोन कंपनीने मोबाईल फोन आणि पेजरसाठी 176 इमोजींचा संच जारी केला.
सन 1998 पासून ते 1999 च्या सुरुवातीस रंगीबेरंगी इमोजींचा वापर सुरू झाला.
पूर्वी ईमेल पाठवण्यासाठी अक्षरांची संख्या फक्त 250 होती.
लोकांना त्यांच्या भावना इतक्या कमी शब्दांत समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवता येत नव्हत्या.
ही अडचण दूर करण्यासाठी कुरिता यांनी पहिल्यांदा इमोजी बनवण्यास सुरुवात केली.
यासाठी त्यांनी कॉमिक बुक्स, लाईटबल्ब, टिकलिंग बॉम्ब आणि हवामान यातून कल्पना घेतल्या आणि नंतर या चित्रांमध्ये स्माईली, राग, आश्चर्य आणि गोंधळ अशा भावना दर्शविणारे इमोजी तयार केले.
लोकांना त्यांचा संदेश कमी शब्दात चांगल्या प्रकारे पोहोचवता यावा यासाठी हे इमोजी तयार करण्यात आले आहे.
वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.